Russia Ukraine War Live : भारतीयांच्या सुटकेसाठी मोदींनी घेतली बैठक, निर्णय काय झाला?

| Updated on: Feb 28, 2022 | 6:19 AM

Russia-Ukraine Crisis 2022 Live Updates and Latest News in Marathi : रशियाची सेना यूक्रेन (Ukraine) ची राजधानी कीवमध्ये शिरली आहे. रशियन सेनेने एका एयरबेसवर कब्‍जा देखील केला. यूक्रेनच्या रक्षा मंत्रालयाने दावा केला आहे की, आता पर्यंत झालेल्या युद्धात 1,000 पेक्षा अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. मात्र जरी असे असले तरी या युद्धामध्ये युक्रेन एकटा पडल्याची खंत युक्रेनच्या राष्टाध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

Russia Ukraine War Live : भारतीयांच्या सुटकेसाठी मोदींनी घेतली बैठक, निर्णय काय झाला?
Russia Ukraine War live updateImage Credit source: AFP

Russia-Ukraine Crisis 2022 Live Updates and Latest News in Marathi : रशियाची सेना यूक्रेन (Ukraine) ची राजधानी कीवमध्ये शिरली आहे. रशियन सेनेने एका एयरबेसवर कब्‍जा देखील केला. यूक्रेनच्या रक्षा मंत्रालयाने दावा केला आहे की, आता पर्यंत झालेल्या युद्धात 1,000 पेक्षा अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. मात्र जरी असे असले तरी या युद्धामध्ये युक्रेन एकटा पडल्याची खंत युक्रेनच्या राष्टाध्यक्षांनी व्यक्त केली आहे. युद्ध सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी देखील नाटो आमच्या मदतीला आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडे मदत मागितली आहे. याबाबत शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष  झेलेन्स्किंनी यांनी मोदींसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Feb 2022 11:49 PM (IST)

    भारतीयांच्या सुटकेसाठी मोदींनी घेतली तातडीची बैठक

  • 27 Feb 2022 11:40 PM (IST)

    पोलंड सीमेवर भारतीयांना मारहाण

  • 27 Feb 2022 10:01 PM (IST)

    फ्रान्सनं रशियासाठी हवाईक्षेत्र बंद केलं

    रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर पश्चिमेकडील देशांनी निर्बंध घालण्या सुरुवात केली आहे. अनेक युरोपियन देशांनी त्यांचं हवाई क्षेत्र रशियासाठी बंद केलं आहे. आता फ्रान्सनं देखील हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

  • 27 Feb 2022 09:46 PM (IST)

    यूक्रेन आणि रशिया यांच्यात थोड्याच वेळात चर्चा

    यूक्रेन आणि रशिया यांच्यात थोड्याच वेळात चर्चा

    रशिया आणि यूक्रेनच्या शिष्टमंडळात बेलारुसच्या सीमेवर चर्चा

    रशियानं यूक्रेनला इशारा दिल्यानंतर चर्चेला प्रस्ताव यूक्रेननं स्वीकारला

    दोन्ही देशांच्या चर्चेकडे जगाचं लक्ष

    ओडेसामध्ये रशियाकडून एअरस्ट्राईक

  • 27 Feb 2022 09:22 PM (IST)

    पुतिन यांची अणवस्त्र वापराबाबतची भूमिका धोकादायक आणि बेजबाबदार : नाटो प्रमुख

    पुतिन यांची अणवस्त्र वापराबाबतची भूमिका धोकादायक आणि बेजबाबदार : नाटो प्रमुख

  • 27 Feb 2022 09:20 PM (IST)

    यूक्रेन रशिया वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची महत्त्वाची बैठक

    यूक्रेन रशिया वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची महत्त्वाची बैठक

  • 27 Feb 2022 08:03 PM (IST)

    बेलारुसच्या अध्यक्षांशी चर्चा झाल्यानंतर रशियाशी यूक्रेनची चर्चा होण्याची शक्यता

    बेलारुसचे नेते अॅलेक्झांडर लुकाशेंको यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियासोबत यूक्रेन चर्चा करणार असल्याची माहिती आहे. यूक्रेनचं असं म्हणणं आहे की रशियासोबत बेलारुसच्या सीमेवर चेर्नोबेल उत्सर्जन झोनजवळ चर्चा झाल्यानंतर रशियाशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 27 Feb 2022 07:38 PM (IST)

    युक्रेनमधून चौथं विमान नवी दिल्लीत दाखल

    युक्रेनमधून चौथं विमान नवी दिल्लीत दाखल

    340 प्रवाशांना घेऊन विमान दाखल

    आतापर्यंत ययुक्रेनमधून चार विमान भारतात दाखल

    5 वे विमान 1 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत पुन्हा दाखल होणार

    आतापर्यंत आलेल्या प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश

    ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून एअर लिफ्टींग

  • 27 Feb 2022 07:11 PM (IST)

    अणूबॉम्बसंदर्भात स्पेशल फोर्सला तयार राहण्याचे व्लादिमीर पुतिन यांचे निर्देश 

    रशियावरील पश्चिमी देशांचे निर्बंध अयोग्य

    अणूबॉम्बसंदर्भात स्पेशल फोर्सला तयार राहण्याचे व्लादिमीर पुतिन यांचे निर्देश

    यूक्रेनची राजधानी कीव मध्ये अलर्ट लागू

    नागरिकांना  घरात  राहण्याचे आदेश

  • 27 Feb 2022 07:02 PM (IST)

    नरेंद्र मोदींची दिल्लीत उच्च स्तरीय बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीचा दौरा अर्धवट सोडला,

    दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

    संयूक्त राष्ट्राच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन

    यूक्रेनमध्ये अजूनही 15 हजार भारतीय अडकल्याची माहिती

  • 27 Feb 2022 06:51 PM (IST)

    यूक्रेनची बेलारूसमध्ये चर्चेसाठी तयारी

    यूक्रेननं बेलारुसमध्ये रशियाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियनं माध्यमांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

  • 27 Feb 2022 06:23 PM (IST)

    बुडापेस्ट आणि बुडारेस्टमधून भारतीयांना विमानांद्वारे मायदेशी आणणार

    ऑपरेशन गंगा अंतर्गत यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बुडापेस्ट आणि बुडारेस्टमधून विमानांद्वारे आणण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं यासाठी विमान फेऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

  • 27 Feb 2022 06:19 PM (IST)

    खारकीववर यूक्रेनचा पुन्हा कब्जा, स्थानिक गव्हर्नरचा दावा

    स्थानिक गव्हर्नरच्या हवाल्यानं एफएपी या वृत्तसंस्थेनं खारकीव या शहरावर यूक्रेननं पुन्हा कब्जा मिळवला असल्याचं म्हटलं. रशियन सैन्याचा प्रतिकार करत यूक्रेनच्या संरक्षण दलांनी खारकीववर नियंत्रण मिळवलं आहे.

  • 27 Feb 2022 05:02 PM (IST)

    यूक्रेनची रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

    यूक्रेनची रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

    रशियाचं युद्धाला जबाबदार असल्याचा दावा

    रशियाकडून मानवी वस्तीवर हल्ले,

    रशियाकडून यूक्रेनला तीन तासांची डेडलाईन

    बेलारूस मध्ये चर्चेला येण्यासाठी मुदत

    यूक्रेननं रशियाचा प्रस्ताव नाकारला

  • 27 Feb 2022 03:44 PM (IST)

    भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा शिवाय पोलंडमध्ये प्रवेश मिळणार

    व्हिसा शिवाय भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये प्रवेश मिळणार आहे. यूक्रेनवर रशियानं आक्रमण केल्यानं भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्यासाठी पोलंडमध्ये कोणत्याही व्हिसाशिवाय प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आलीय. पोलंडमधील भारतीय दुतवासाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

  • 27 Feb 2022 03:05 PM (IST)

    रशियानं जगासमोर दोनचं पर्याय सोडले, पहिला तिसरं महायुद्ध, जो बायडन यांचा इशारा

    रशियानं सध्या दोनचं पर्याय जगासमोर सोडले आहेत. एकतर रशियासोबत युद्ध पुकारुन तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात करावी लागेल. किंवा आंतरराष्ट्रीय कायदे मोडणाऱ्यांवर कठोर निर्बंध लावून कायमस्वरुपी धडा शिकवावा लागेल. तिसरं महायुद्ध टाळायचं असेल तर रशियावर कठोर निर्बंध लावून धडा शिकवावा लागेल, असं जो बायडन म्हणाले.

  • 27 Feb 2022 02:40 PM (IST)

    रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तयार

    रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तयार असल्याची माहिती आहे.

    तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे पुतिन आणि झेलेंस्की यांच्याशी चांगले संंबंध असल्यान मध्यस्थी करतील अशी शक्यता आहे.

  • 27 Feb 2022 02:26 PM (IST)

    चेर्नोबिलच्या अणू ऊर्जा प्रकल्पाचं रशियन आणि यूक्रेनच्या फौजांकडून संयुक्तरित्या संरक्षण 

    चेर्नोबिलच्या अणू ऊर्जा प्रकल्पाचं रशियन आणि यूक्रेनच्या फौजांकडून संयुक्तरित्या संरक्षण

  • 27 Feb 2022 01:31 PM (IST)

    रशियाशी चर्चेसाठी तयार – झेलेन्स्की

    आपण रशियाशी चर्चेसाठी तयार असल्याचं युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट देखील ठेवली आहे. आम्ही रशियाशी चर्चा करू, मात्र ही चर्चा बेलारुसमध्ये होणार नाही असे त्यांनी म्हले आहे.

  • 27 Feb 2022 12:32 PM (IST)

    Russia Ukraine War : क्रिमियाला पाणीपुरवठा करणारे धरण उडवले

    रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संर्घष सुरू होता. या संर्घषाचे रुपांतर अखेर युद्धात झाले आहे. गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आणि त्यानंर घमासान युद्धाला सुरुवात झाली आहे.  रशियावर आंतराष्ट्रीय दबाव असताना देखील गेल्या चार दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्य स्थळ उद्धवस्त केले आहेत. याचदरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओमध्ये क्रिमियाला पाणीपुरवठा करणारे तसेच अतिरिक्त पाण्यापासून संरक्षण करणारे धरणच बॉम्बने उडून देण्यात आले आहे. हा बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की, क्षणात धरण उद्धवस्थ झाले. बॉम्बस्फोट होतात पाण्याची एक उंच लाट उसळली. युद्धादरम्यान सर्वच बाजुने युक्रेनची नाकेबंदी करण्याचा रशियाचा प्लॅन आहे. याच पार्श्वभूमीवर धरणात बॉम्बस्फो घडवण्यात आला असावा असा अंदाज आहे.

  • 27 Feb 2022 11:27 AM (IST)

    रशिया युक्रेन युद्धात अणुबॉम्बची एन्ट्री

    रशिया आणि युक्रेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचे पहायाला मिळत होते.  अखेर हा संघर्ष टोकाला पोहचला आणि युद्धाला सुरुवात झाली. रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे हजारो नागरिक मारले गेले आहेत. जगभरातून रशियाचा विरोध केला जात आहे. मात्र तरी देखील हे युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. आता  रशिया- युक्रेन युद्धात आता अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार बेलारुसने रशियाला आपल्या देशात अण्वस्त्र तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता युक्रेनच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

  • 27 Feb 2022 11:07 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय कायदे तोडणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल – बायडन

    रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युद्ध समाप्तीची घोषणा करून, सैन्या माघारी बोलवावे अशी मागणी युरोपीयन रा्ष्ट्रांकडून करण्यात येत आहे. मात्र युद्ध सुरूच असल्याने आता यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय कायदे तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना धडा शिकवावाच लागेल. तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.

  • 27 Feb 2022 10:53 AM (IST)

    राजधानी मास्कोमध्ये पुतीनविरोधात जोरदार निदर्शने

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आदेशानंतर गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेलाय. पुतीन यांनी युक्रेनविरोधातील युद्ध बंद करावे अशी मागणी आता रशियामधूनच होताना दिसत आहे. पुतीन यांच्या या लष्करी कारवाईविरोधात रशियात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यातील अनेक नागरिकांना अटक देखील करण्यात आले आहे. तसेच रशियामध्ये फेसबूक सारख्या सोशल मीडिया साईटवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

  • 27 Feb 2022 10:38 AM (IST)

    युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे सिंधियांनी केले स्वागत

    आज पहाटे युक्रेनमध्ये अडकलेल्या 250 विद्यार्थ्यांना घेऊन, विमान भारतामध्ये दाखल झाले. या विद्यार्थ्यांचे हवाई उड्डाण मंत्री सिंधिया यांनी स्वागत केले.  यावेळी बोलताना सिंधिया यांनी म्हटले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने युक्रेनच्या राष्टाध्यक्षांच्या संपर्कात आहेत.

  • 27 Feb 2022 09:38 AM (IST)

    हंगेरीमधून तिसरे विमान दिल्लीला रवाना

    युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या वि्दयार्थ्यांना भारतात आणले जात आहे. शनिवारी आणि आज पहाटे असे दोन विमान दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान आता तिसरे विमान विद्यार्थ्यांना घेऊन , बुडापेस्ट हंगेरीमधून भारताकडे रवाना झाला आहे.

  • 27 Feb 2022 07:58 AM (IST)

    Russia Ukraine War : भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी मानले सरकारचे आभार, सांगितले थरारक अनुभव

    युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी सुखरूप भारतामध्ये परतले आहेत. शनिवारी एक विमान या विद्यार्थ्यांना घेऊन भारतात दाखल झाले तर आज पहाटे दुसरे विमान आले. दरम्यान या विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. युक्रेनमध्ये युद्धामुळे स्थिर गंभीर बनली आहे. जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपून बसावे लागत आहे. हल्ला कधी होईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सुखरूप भारतात परतलो यासाठी केंद्र सरकारचे आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 27 Feb 2022 06:52 AM (IST)

    बुखारेस्टमधून आज पहाटे दुसरे विमान भारतात दाखल

    रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना सुरक्षीत भारतात आणण्यात येत असून, आज पहाटे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दुसरे विमान भारतात दाखल झाले आहे. या विमानातून युक्रेनमध्ये अडकलेले 250 भारतीय नागरिक देशात परतले आहेत.

  • 27 Feb 2022 06:47 AM (IST)

    YouTube ने रशियन वाहिन्यांना बॅन केले

    युट्यूबने मोठा निर्णय घेतला आहे. युट्यूबने रशियन वाहिन्यांना बॅन केले आहे. त्यामुळे आता रशियन चॅनल युट्यूब या सोशल मीडिया साईटवर व्हिडीओ अपलोड करू शकणार नाहीत. तसेच जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर देखील युट्यूबने प्रतिबंध घातला आहे.

Published On - Feb 27,2022 6:24 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.