Russia-Ukraine Crisis 2022 Live Updates and Latest News in Marathi आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील गुरुवारी रशियाने (Russia) युक्रेनविरोधात (Ukraine) युद्धाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 57 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य मंत्री विक्टर ल्याशको यांनी केला आहे. दरम्यान दुसरीकडे युक्रेनवली हल्ल्याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनच्य पंतप्रधानांबाबत तिथे घडत असलेल्या घडामोडी संदर्भात चर्चा केली आहे.
यूक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरांवर कब्जा मिळवण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरु आहेत. काळ्या समूद्राजवळील ओडेस्साजवळ टँक दिसत आहेत. रशियानं कीववर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. रशियाचे प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी यूक्रेननं नवीन डाव खेळलाय. यूक्रेनच्या आर्मीनं एक पूल उडवून दिला आहे. त्यामुळं रशियाचं सैन्य कीवमध्ये पोहोचण्यास अडचणी निर्माण होतील.
रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना पहिल्या दिवशी तोंड दिल्यानंतर यूक्रेननं देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवातकेलीय. राजधानी कीवमध्ये भीषण लढाई होण्याची शक्यता आहे. यूक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून आक्रमक प्रतिहल्ले केले जात आहेत. यूक्रेनकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार सात एअरक्राफ्ट पाडले आहेत. हल्ले प्रतिहल्ल्यांनी कीव हादरुन गेलंय.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. यूक्रेनशी वाटाघाटी कराव्यात, अशी विनंती शी जिनपिंग यांनी केल्याचं चीनच्या माध्यमांनी म्हटलंय.
President of China, Xi Jinping speaks to Russian President Vladimir Putin, calls for 'negotiation' with Ukraine- state media: AFP
(file photos) pic.twitter.com/nbalbdFcMh
— ANI (@ANI) February 25, 2022
रशियाला घेरण्यासाठी नाटोनं व्लादिमीर पुतीन यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतलाय. तर, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची संपत्ती देखील जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यूक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे 1 हजार सैनिक मारले गेल्याचा दाव करण्यात आलाय.
युक्रेनमध्ये मालेगांवचा वैद्यकीय शिक्षण घेणारा विध्यार्थीही अडकला…
युक्रेन मधील ओडेसा शहरातील अडकला असून त्याचे घरच्यांचे भारतीय प्रशासनाला मदतीचे आवाहन..
– वृषभ अशोक देवरे, मालेगांव असे या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे
पालघर जिल्ह्यातील 7 जण युक्रेन मध्ये अडकले . सर्व एमबीबीएस चे विद्यार्थी, . विक्रमगड तालुक्यातील 2 , वाडा तालुक्यातील 3 तर वसई तील दोघांचा समावेश . जिल्हा प्रशासनाकडून मंत्रालयात माहिती सादर, पालघर जिल्हा प्रशासनाकडून माहिती
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या सैन्यदलानं सत्ता हातात घ्यावी, असं आवाहन केलं आहे. यासंदर्भात रॉयटर्स या वृतसंस्थेनं माहिती दिली आहे.
Russian President Vladimir Putin to Ukrainian military- “Take power into your own hands”: Reuters pic.twitter.com/JYdqmNTm4t
— ANI (@ANI) February 25, 2022
कदाचित तुम्ही मला शेवटतं पाहत असाल, यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर जेलेन्स्की यूरोपियन राष्ट्रांशी संवाद साधताना गहिवरले.
रशियानं यूक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारला आहे. व्लादिमीर पुतीन हे यूक्रेनच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार नसले तरी त्यांनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांचं पथक चर्चेसाठी पाठवण्याचं मान्य केलंय, अशी माहिती रशियाच्या भारतातील दुतावासाकडून देण्यात आली आहे.
Russian President Vladimir Putin is ready to send a delegation of high-ranking officials to Minsk to hold talks with Kiev- Kremlin spokesman Dmitry Peskov: Russian Embassy in India
(file pic) pic.twitter.com/Ee6CgjV9hX
— ANI (@ANI) February 25, 2022
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची यूक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा
Received call from Ukrainian FM @DmytroKuleba.
He shared his assessment of the current situation.I emphasized that India supports diplomacy & dialogue as the way out.
Discussed predicament of Indian nationals, including students. Appreciate his support for their safe return.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 25, 2022
भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी रोमानिया बाॉर्डरकडे रवाना झाली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया आणि हंगेरी मार्गे भारतात आणलं जाणार आहे. एएनआयनं याबाबत ट्विट केलं आहे.
The first batch of Indian students have left Chernivtsi for the Ukraine-Romania border
MEA Camp Offices are now operational in Lviv and Chernivtsi towns in western Ukraine. Additional Russian speaking officials are being sent to these Camp Offices. pic.twitter.com/OvRlqA8Q4t
— ANI (@ANI) February 25, 2022
इंडियन मेडिकल असोसिएशननं यूक्रेनमध्ये अडकलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या सूटकेसाठी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. विद्यार्थ्यांसाठी हेल्पडेस्क स्थापन करण्याची आणि त्यांची आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनी यूक्रेनवरील रशियाचा हल्ला हा यूरोप आणि संपूर्ण जगाच्या सूरक्षेसाठी धोका असल्याचं म्हटलंय. त्यांनी रशियाचा निषेध देखील केलाय.
रशियानं यूक्रेनवर हल्ले सुरु केलेले आहेत. नाटोचे देश रशियाला प्रत्युत्तर देण्याची शक्यता निर्माण झालीय. यापार्श्वभूमीवर रशियानं ब्रिटीश विमानांसाठी एअरस्पेसवर बंदी घातलीय.
Russia has banned British airlines from landing at its airports or crossing its airspace, its state civil aviation regulator said on Friday: Reuters #RussiaUkraineConflict
— ANI (@ANI) February 25, 2022
यूक्रेनच्या रस्त्यावर रशियाचे रणगाडे आणि टँक पाहायला मिळत आहेत
रशियानं यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं
यूक्रेनच्या राजधानीत रशियाचं सैन्य
यूक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियाचे 800 जवान मारले असल्याचा दावा केलाय. तर, 6 फायटर जेट पाडण्यात आले असल्याचा दावा यूक्रेननं केलाय. हल्ले थांबवा अन्यथा नाटोकडे ही अणूबॉम्ब आहेत, असा इशारा फ्रान्सनं रशियाला दिला आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना विमानाने आणण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाची सरशी होताना दिसून येत आहे. रशियाने आक्रमण करत युक्रेनच्या चेरनोबिल आणु प्रकल्पावर कब्जा मिळवल्याचे वृत्त समोर येत आहे. या वृत्ताला युक्रेनच्या पंतप्रधानांनी देखील दुजोरा दिला आहे.
Chernobyl nuclear plant targeted as Russia invades Ukraine https://t.co/qAPEhspdjt
— Al Jazeera English (@AJEnglish) February 25, 2022
काँग्रेस नेते शशि थरूर यांनी युक्रेन -रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केले आहे. त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये युक्रेनियन ध्वज पाठिवर घेतलेल्या पुरुषाने रशियन ध्वज असलेल्या महिलेला अलिंगन दिले आहे. या फोटोला कॅप्शन देताना थरूर यांनी म्हटले आहे की, युद्ध आणि संघर्षावर प्रेमाचा विजय होईल अशी अशा करुया.
Poignant: A man draped in the Ukrainian flag embraces a woman wearing the Russian flag. Let us hope love, peace & co-existence triumph over war & conflict. pic.twitter.com/WTwSOBgIFK
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 25, 2022
रशिया-युक्रेन युद्धाची सर्वात मोठी बातमी
रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचा सर्वात मोठा दावा
96 तासात रशिया युक्रेनवर ताबा मिळवेल- जेलेन्स्की
‘बंकरमध्ये लपा, युक्रेनचं नागरिकांना आवाहन’
युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेर रशिया आणि युक्रेनचे सैन्य आमने-सामने आल्याचे वृत्त आहे.
#BREAKING Ukraine army says fighting Russian forces outside capital Kyiv pic.twitter.com/RW0VA2X7wO
— AFP News Agency (@AFP) February 25, 2022
मिळत असलेल्या माहितीनुसार रशियामध्ये तब्बल 1.5 लाख पर्यटक अडकले आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर विमान बंदी करण्यात आल्याने या पर्यटकांना आपल्या मायदेशी परणे अश्यक झाले आहे. रशियामध्ये अडकलेले हे पर्यटक दुतावासामार्फत आपल्या देशातील सरकारच्या संपर्कात आहेत.
रशियाचे विमान पाडण्याच्या नादात युक्रेनमध्ये एका मनवी वस्ती असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये इमारतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
Ukrainian forces downed an enemy aircraft over Kyiv in the early hours on Friday, which then crashed into a residential building and set it on fire: Reuters
Visuals from Kyiv, Ukraine.
(Visuals – Reuters)#RussiaUkraineConflict pic.twitter.com/PbC6qr62qb
— ANI (@ANI) February 25, 2022
BREAKING: Apartment complex in Kyiv hit by debris from falling plane; no word on casualties pic.twitter.com/jufAnGFeql
— BNO News (@BNONews) February 25, 2022
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज युरोपियन युनियनच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रशियावरील आर्थिक निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने कोणतेही कारण नसताना युक्रेनवर हल्ला केला. हल्ल्यासाठी खोटी कारणे सांगितल्याचा आरोप रशियावर केला आहे. रशियावर निर्बंध घातल्यास सरकार अडचणित येईल असे त्यांनी म्हटले आहे.
सलग दोन दिवसांपासून रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरू आहे. दरम्यान आज रशियाने चेरनोबिल प्लांटवर कब्जा केल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. असेच चालू राहिले तर येत्या 96 तासांमध्ये रशिया युक्रेनची राजधानी कीव देखील ताब्यात घेऊ शकते अशी भीती त्यांनी वर्तवली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल आपल्या सैन्याला युक्रेनविरोधात विशेष लष्करी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रशिय सैनिकांनी युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यात 100 हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील सकाळी युक्रेनच्या खार्किव आणि नेझालेझ्नोस्टी येथे रशियन सैनिकांकडून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले.
Visuals from Kharkiv & Maidan Nezalezhnosti in Kyiv Ukraine this morning,amid #RussiaUkraineConflict
Two loud blasts were heard in Kyiv earlier this morning; Russian President Vladimir Putin authorized a military operation in eastern Ukraine, in Kyiv yesterday
(Source: Reuters) pic.twitter.com/7hkGvm83wi
— ANI (@ANI) February 25, 2022
युक्रेन आणि रशियामधील वाद शिगेला पोहोचला आहे. कालपासून रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहे. या हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीवचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रशियाकडून युक्रेनच्या अनेक भागांमध्ये बॉम्बस्फोट केल्याचे वृत्त आहे.
BREAKING: Explosions have been heard in the Ukrainian capital of Kyiv as Russian forces pressed on with a full-scale invasion that resulted in the deaths of more than 100 Ukrainians in the first full day of fighting. https://t.co/M1IiIRkxv7
— The Associated Press (@AP) February 25, 2022