Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमध्ये पुन्हा युद्धविराम
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. रशियाकडून आज युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी देखील रशियाने पाच तासांचा असाच एक युद्धविराम घेतला होता.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक युक्रेननियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मोठ्याप्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. गेल्या चौदा दिवसांमध्ये सहाशेहून अधिक मिसाईल रशियाने युक्रेनवर डागल्या आहेत. तसेच रशियाकडू युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे युक्रेनकडून देखील रशियाला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्र आणि जपानने देखील रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. आता या सर्व घडामोडीदरम्यान एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे ती म्हणजे रशियाने युक्रेमध्ये पुन्हा एकदा युद्धविरामाची (ceasefire) घोषणा केली आहे. यापूर्वी दे्खील रशियाने परदेशी नागरिकांना युक्रेनबाहेर पडण्यासाठी पाच तासांचा एक युद्दविराम घेतला होता. या काळात अनेक परदेशी नागरिकांना युक्रेनबाहेर काढण्यात आले होते.
अमेरिकेसह युरोपीयन देश आक्रमक
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर नाटोचे सदस्य असलेले देश अधिक आक्रमक झाले आहेत. अमेरिकेसह युरोपीयन देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध घातले आहेत. या निर्बधाचा मोठा फटका हा रशियाला बसताना दिसून येत आहे. रशियन चलनामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. यापुढे जाऊन आता अमेरिकेने रशियामधून आयात होणाऱ्या गॅस कच्चे तेल आणि इतर ऊर्जाेच्या सामुग्रीवर देखील बंदी घातली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी त्याबाबत घोषणा केली. अमेरिकेपाठोपाठ आता जपानने देखील रशियावर निर्बंध लादले आहेत.
पुन्हा युद्धविरामाची घोषणा
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चौदा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दुसरीकडे या युद्धात रशियाचे देखील अनेक सैनिक मारले गेले आहेत. रशियाने युद्धबंदीची घोषणा करावी यासाठी रशियावर आंतराष्ट्रीय दबाव वाढत आहे. मात्र रशियाने दबावाला झुगारून युद्ध सुरूच ठेवले आहे. आज रशियाकडून युद्ध विरामाची घोषाणा करण्यात आली आहे. यापूर्वी देखील रशियाकडून युक्रेनमध्ये पाच तासांचा युद्धविराम घेण्यात आला होता. परदेशी नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडणे सोपे व्हावे यासाठी युद्ध विराम घेत असल्याचे रशियाने म्हटले होते.
युक्रेनमध्ये युद्धविराम
Russia announces humanitarian ceasefire in Ukraine for Wednesday
Read @ANI Story | https://t.co/t6VCFvlXRB#Russia #UkraineCrisis pic.twitter.com/f4FafV4wGW
— ANI Digital (@ani_digital) March 8, 2022
संबंधित बातम्या
Video : रशियाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईचा थरार, तर युक्रेननं तरुणांना उतरवलं युद्धाच्या मैदानात
Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?
Russia Ukraine war : अमेरिकेने रशियाकडून तेल आयातीवर बंदी घातली, राष्ट्राध्यक्ष बायडेन काय म्हणाले?