Russia-Ukraine war : मध्ये पडू नकोस, पाहा रशियाने आता कोणत्या देशाला दिली धमकी
रशिया आणि युक्रेन या दोन देशामध्ये अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. आतापर्यंत या युद्धात हजारो लोकं मारली गेली. हजारो लोकं विस्थापित झाली. पण अजूनही दोन्ही देशांमध्ये कोणताही चर्चेतून मार्ग निघालेला नाही. युद्धात इतर कुणीही पडू नये असा इशारा रशियाने दिला आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्ध अजूनही थांबलेलं नाहीये. दोन्ही देशांमधील युद्धामुळे आतापर्यंत अनेक लोकांची जीव गेला आहे. युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिकासह अनेक देश पुढे आले आहेत. पण रशिया अशा देशांना मध्ये न पडण्याचा इशारा देत आहे. भारताने दोन्ही देशांना आधीच चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे. आता रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी आपल्या फ्रेंच समकक्षांना फोन करून मध्ये न पडण्याचा इशारा दिला आहे. फ्रान्स युक्रेनमध्ये सैन्य तैनात करणार होता. पण ही माहिती जशी रशियाला मिळाली त्यांनी लगेचच फ्रान्सला याबाबत इशारा देऊन टाकला. मॉस्को संघर्ष संपवण्यासाठी चर्चेत सहभागी होण्यास तयार आहे. पण त्याने युक्रेनमध्ये सैन्य पाठवू नये असं रशियाने म्हटले आहे.
फ्रान्सला धमकी
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी फ्रेंच संरक्षण मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्याशी फोनवर चर्चा केली. जर पॅरिसने युक्रेनमध्ये फ्रेंच सैन्य पाठवले तर यामुळे फ्रान्ससाठीच समस्या निर्माण होईल असे त्यांनी म्हटले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फेब्रुवारीमध्ये युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले होते.
मॅक्रॉन यांच्या या वक्तव्यावरुन दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. ऑक्टोबर 2022 मध्ये केलेल्या या वक्तव्यानंतर रशिया आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांमधील हे पहिले फोन संभाषण आहे. शोईगु यांनी चर्चेला संमती’ व्यक्त केली. पण जर सैन्य पाठवणार असाल तर त्याची किंमत मोजावी लागेल असे ही म्हटले आहे. शांतता चर्चेसाठी रशिया तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
पुन्हा चर्चेची शक्यता
रशिया आणि युक्रेन यांच्यात मार्च 2022 मध्ये इस्तंबूलमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर त्या पुढची चर्चा होण्याची शक्यता आहे. असे रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितलेय. रशियाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर इस्तंबूलमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली होती. युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याचा आग्रह सोडून देईल आणि तटस्थ राहील, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पण या चर्चेतून पुढे काहीही निर्णय झाला नव्हता.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. यावेळी लेकोर्नू यांनी 22 मार्च रोजी ‘मॉस्को कॉन्सर्ट हॉल’वर झालेल्या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. या प्राणघातक हल्ल्यात 145 जणांचा मृत्यू झाला होता.