Russia-Ukraine war | युद्धात परतणार 300 वर्ष जुना काळ, पुतिन यांचा घोडेस्वारांना युद्धात उतरवण्याचा निर्णय
Russia-Ukraine war | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन घोडेस्वारांना युद्धात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. हे रशियाचे बश्किर घोडेस्वार आहेत. रशियाची ही ऐतिहासिक फौज युद्ध लढताना दिसणार आहे.
मॉस्को : सध्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, मशीनगनचा जमाना आहे. माणसापेक्षा पण जास्त काम मशीन्स करत आहेत. अशावेळी व्लादिमीर पुतिन यांनी, युद्धात घोडस्वारांना उतरवण्याचा निर्णय घेतलाय. निश्चित यामुळे अनेक जण हैराण झाले आहेत. पुतिन यांनी निर्णय घेतलाय की, युद्धात युक्रेनच्या मशीनगन्सचा सामना मध्ययुगीन घोडेस्वार करतील. रशियाच्या बश्कोर्तोस्तानमधील हे बश्किर योद्घे आहेत. पुतिन यांनी या घोडेस्वारांना युद्धात उतरवण्याचा निर्णय का घेतलाय? रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 550 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. पायदळ सेना, मशीन गन आणि आर्टिलरी 133 MM चे गोळे डागले जात आहेत.
रणभूमीमध्ये ड्रोन निर्णायक ठरतय. पुतिन यांनी आता युद्धाला 10-20 वर्ष नाही, 300 वर्ष मागे घेऊन जाण्याचा निर्णय घेतलाय. मध्यकाळापासून दुसऱ्या विश्व युद्धापर्यंत घोड्यावर बसून युद्ध लढल जायच. रशिया-युक्रेन युद्धात आता घोडेस्वाराचा काळ परतणार आहे. घोडेस्वार ज्या प्रमाणे बाण सोडायचे. रशियन सैन्य सुद्धा तसच घोड्यावर बसून शत्रूवर हल्ला करणार आहे. रशियाचे घोडेस्वार योद्धे युद्ध लढतील, असा निर्णय पुतिन यांनी घेतला आहे. लवकरच घोडेस्वारांची तैनाती ईस्टर्न फ्रंटलाइनवर केली जाईल. रशियाचे ह बश्किर घोडेस्वार आहेत. थंडीच्याकाळात रशियाची ही ऐतिहासिक फौज युद्धभूमीत दिसेल.
सध्याच्या जमान्यात निर्णय लागू पडेल का?.
रशियाच्या बश्कोर्तोस्तानमध्ये राहणारी ही लोकं आहेत. या क्षेत्रातील लोकांना बश्कीरिया म्हटलं जातं. वोल्गा नदी आणि यूराल माऊंटन रेंजमध्ये हा भाग आहे. इतिहासात या घोडेस्वारांनी अनेक युद्ध लढली आहेत. बश्किर तुर्किक वंशाचा समुदाय आहे. बश्कोर्तोस्तान प्रांतात ते अजूनही आपली सांस्कृतीक ओळख टिकवून आहेत. पुतिन यांनी निर्णय घेतला असला, तरी तो सध्याच्या जमान्यात लागू पडेल का?. पुतिन यांनी हा निर्णय घेतलाय, त्यामागे थंडी एक कारण आहे. थंडीच्या काळात बर्फाळ पायदळ सैन्यासाठी चालण खूप मुश्किल असतं. पुतिन यांनी हा निर्णय घेण्यामागे कारण काय?
मशीनरी पुढे नेणं आव्हानात्मक असतं. युक्रेनकडे अमेरिकेचे अबराम्स टँक्स आहेत. पण 2 सेंटीमीटरचा बर्फ पार करणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. पण तेच घोडेस्वाल बर्फाळ प्रदेशात आरामात पुढे जाऊ शकतात. पायदळ सैन्याच्या तुलनेत घोडेस्वार कमी थकतात. ते बर्फात फसण्याची शक्यता देखील कमी असते. ते मोठा हल्ला आरामात आणि वेगात करु शकतात. थंडीमध्ये पूर्व युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेण्याचा पुतिन यांचा इरादा आहे. म्हणून बश्किल घोडेस्वारांना जबाबदारी दिली आहे.