Russia चा यूक्रेनमध्ये रक्तरंजित खेळ सुरुच, मारियुपोलमध्ये आर्ट स्कूलवर बॉम्बचा वर्षाव, 400 लोक अडकल्याची भीती
रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध अद्याप सुरुच आहे. रशियाच्या सैन्यानं यूक्रेनमधील मारियुपोल (Mariupol ) शहरातील एका आर्ट स्कूलवर हल्ला केला आहे.
नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध अद्याप सुरुच आहे. रशियाच्या सैन्यानं यूक्रेनमधील मारियुपोल (Mariupol ) शहरातील एका आर्ट स्कूलवर हल्ला केला आहे. रशियन सैन्यानं त्या शाळेवर बॉम्ब टाकले . त्या शाळेत 400 लोक थांबले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब टाकल्यानं शाळेची इमारत नष्ट झाली आहे. त्यामुळं उद्धवस्त झालेल्या इमारातीखाली 400 लोक दबले असल्याची शक्यता आहे. अद्याप त्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. रशियानं सैन्यानं बुधवारी मारियुपोलमध्ये एका थिएटरवर बॉम्ब हल्ला केला होता. तिथं देखील नागरिक थांबले होते. थिएटरमधून 130 लोकांना वाचवण्यात यश आलं होतं.
मारियुपोल हे यूक्रेनमधील बेट आहे. युद्धाच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ठिकाण आहे. रशियन सैन्यानं त्याला चारी बाजून घेरलं आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या शहराला होणारा पाणीपुरवठा, वीज आणि इतर सुविधा बंद करण्यात आलेल्या आहेत. रशियन सैन्य सातत्यानं शहरावर हल्ले करत आहेत. दुसरीकडे यूक्रेनचे अध्य वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मारियुपोलला रशियानं टाकलेला वेढा एतिहासिक असेल. रशिया सध्या युद्ध गुन्हा करत आहेत. दोन्ही देशांमध्ये 24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरु असल्यानं लाखो यूक्रेन नागरिकांनी देश सोडला आहे.
मारियुपोल शहरात रशियन सैन्य घुसलं
रशियन सैन्य हळू हळू मारियुपोल शहरावर नियंत्रण मिळवत आहे. रशियाच्या सान्यानं मारियुपोलच्या मध्यवर्ती ठिकाणांपर्यंत शिरकारव केला आहे. मारियुपोलमधील स्थिती बिघडत असून यूरोपिय देशांकडे मदतीची याचना करण्यात आली आहे. मारियुपोलमध्य लहान मुलं आणि वयस्कर नागरिकांना मारलं जात असून शहर नष्ट करण्यात येत असल्याचा व्हिडिओ स्थानिक अधिकारी मायकल वर्शनिन यांनी जारी केला आहे.
मारियुपोलमधून नागरिकांचं स्थलांतर
यूक्रेनमध्ये रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 10 रहिवशी ठिकाणांपैकी 8 ठिकाणांहून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. मारियुपोल सिटी काऊन्सिलनं दावा केला आहहेकी रशियन सैनिकांनी हजारो नागरिकांना रशियाच्या भागात स्थालंतरित होण्यासाठी दबाव टाकला आहे.
इतर बातम्या:
Ulhasnagar मध्ये धुळवडीच्या दिवशी हत्याकांड! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या
PM Kisan Yojna : अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर Zero Balance, योजनेतील निधीची वसुली करायची कशी ?