Vladimir Putin यांना हत्येची भीती, विषप्रयोगाचा धसका, 1 हजार कर्मचाऱ्यांना हटवलं
रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी त्यांच्या पर्सनल स्टाफमधील 1000 सदस्यांची बदलंल आहे. ते कर्मचारी त्यांना विष देतील अशी भीती पुतिन यांना वाटत असल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली: रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी त्यांच्या पर्सनल स्टाफमधील 1000 सदस्यांची बदलंल आहे. ते कर्मचारी त्यांना विष देतील अशी भीती पुतिन यांना वाटत असल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. डेली बीस्टच्या वृत्तात रशियन सरकारच्या सूत्राचा हवाला देऊन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बॉडीगार्डस, स्वयंपाकी आणि इतर कामगार आणि सचिवांना काढून टाकण्यात आले. रशियाने यूक्रेनवर (Russia Ukraine War) केलेल्या हल्ल्याचा जगभरातील देशांनी निषेध केला आहे. व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जगभरात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियावरही निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या अधिकाऱ्यांनी रशिया युक्रेनच्या सामायिक सीमेवर सैन्य गोळा करत आहे, असा इशारा दिला होता. रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र, मॉस्कोनं त्या शक्यता नाकारल्या होत्या. मात्र, 24 फेब्रुवारीला पुतीन यांच्या आदेशावरून युक्रेनवर हल्ला करण्यात आला. त्याचवेळी, अमेरिकेचे दक्षिण कॅरोलिनाचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येबद्दल वक्तव्य केले होते. या महिन्याच्या सुरुवातीला ग्रॅहमने पुतीन यांची तुलना अॅडॉल्फ हिटलरशी केली होती. युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणीतरी पुतीन यांना संपवणं हा असू शकतो असा दावा देखील त्यानं केला होता.
क्रेमलिन विषप्रयोगामुळं बदनाम
लिंडसे ग्रॅहम यांनी डेली बीस्टला दिलेल्या माहितीनुसार विषप्रयोगा सारखा प्रकार कोणत्याही परदेशी सरकारकडून केला जाणार नाही. क्रेमलिनमधील रशियन गुप्तचर विभाग ही कदाचित एकमेव संस्था आहे जी लोकांना मारण्यासाठी विष देऊन मारते. विषबाधा करण्याच्या घटना यापूर्वी क्रेमलिन म्हणजेच रशियन अध्यक्षीय कार्यालयाशी जोडल्या गेल्या होत्या. क्रेमलिनमधील टीकाकार मज्जातंतू एजंट नोविचिक यांना विष देण्यात आलं होतं. पुतीन यांचे सर्वात मोठे टीकाकार अलेक्सी नवलनी यांना ऑगस्ट 2020 मध्ये नोविचिक देण्यात आले. मात्र उपचारामुळे तो वाचले होते. आता ते सध्या रशियातील तुरुंगात आहेत.
यूक्रेन विरोधातील युद्धात रशियाचंही नुकसान
यूक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आतापर्यंत लाखो लोकांना देश सोडावा लागला आहे. यूक्रेनच्या लोकांनी पोलंड, रोमानिया, मोल्दोव्हा यांसारख्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. दुसरीकडे रशियाचेही युद्धात मोठे नुकसान झाले आहे. यूक्रेनसोबतच्या युद्धात आतापर्यंत रशियाचे सर्वोच्च पाच जनरल मारले गेले आहेत.
इतर बातम्या:
जपानचे पंतप्रधान Fumio Kishida आणि Pm Modi यांची मोठी घोषणा, भारतात 3.2 लाख कोटी गुंतवणार