Russia Ukraine War Video : युक्रेनमधील इरपिन शहर बेचिराख, काळजाचा थरकाप उडवणारा Video
हल्ल्यात युक्रेनमधील (Russia Ukraine War) अनेक शहरांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक इमारती कोसळल्या आहेत. तर सगळीकडे बेचिराख युक्रेन दिसतंय. कालपासून रशियाने आपले लक्ष युक्रेनमधील इरपिन (Irpin) शहराकडे केंद्रीत केले होते.
नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून रशियाचे (Russia) युक्रेनवर सतत जोरदार हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील (Russia Ukraine War) अनेक शहरांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक इमारती कोसळल्या आहेत. तर सगळीकडे बेचिराख युक्रेन दिसतंय. कालपासून रशियाने आपले लक्ष युक्रेनमधील इरपिन (Irpin) शहराकडे केंद्रीत केले होते. रशियाने या शहरावर जोरदार मिसाईल हल्ले चढवल्या या शहरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. बेचिराख झालेलं हे शहर तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. तर रशियाचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांवर अणुयुद्धाचा विचार असल्याचा आरोप केला. लॅव्हरोव्ह यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत सांगितले की, हे स्पष्ट आहे की तिसरे महायुद्ध केवळ अण्वस्त्र युद्ध असू शकते. मी हे निदर्शनास आणू इच्छितो की अणुयुद्धाची कल्पना रशियन लोकांच्या डोक्यात नसून पाश्चात्य देशांच्या नेत्यांच्या मनात सतत आहे.
बेचिराक इरपिनचा व्हिडिओ
#Irpin, #Ukraine. pic.twitter.com/PzR6G9fv5B
— NEXTA (@nexta_tv) March 3, 2022
युक्रेनिय सैन्याचा दावा काय?
युक्रेनच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या युद्धात रशियाचे खूप नुकसान झाले आहे. रशियाने 9000 सैनिक गमावले आहेत. याशिवाय, 30 विमाने, 374 कार, 217 टँक आणि 900 आर्म्ड पर्सनल कॅरियर्स गमावले आहेत. याशिवाय त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने रशियाशी वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात आज पुन्हा बेलारूस-पोलंड सीमेवर चर्चा होणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती. मात्र ती शक्यताही आता धुसर झाली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला माघार घेण्याचे आवाहन केले असून, गेल्या आठवड्यात सुमारे 9,000 रशियन मारले गेले आहेत. असा त्यांचा दावा आहे.
रशियाने हल्ले आणखी तीव्र केले
रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, कीवमध्ये एकाच वेळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे रशियाने हल्ले आणखी तीव्र केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाची दाहकता आणकी वाढली आहे. युद्ध थांबवण्याासाठी जगभरातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. मात्र अजूनही युद्ध शांत व्हायचे नाव घेत नाही.
Russia Ukrane War : रशियाशी चर्चेला युक्रेनचा नकार, युद्धाची धग आणखी वाढणार