‘ब्लादिमीर पुतिन कधीही अणुबॉम्ब टाकू शकतात, 3 देशांना सर्वात मोठा धोका’, जेलेन्स्की यांच्या माजी प्रवक्त्याचा दावा

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन कोणत्याही क्षणी अणूबॉम्ब टाकू शकतात, असा मोठा दावा यूक्रेनचे राष्ट्रपती बोलिदिमीर जेलेन्स्की यांचे माजी प्रवक्ते यूलिया मंडेल यांनी केलाय. इतकंच नाही तर यूक्रेनसह अन्य देशांवरही अणुबॉम्ब हल्ला होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुतिन आण्विक हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. पोलंड, मोल्डोआ आणि फिनलँड हे देश पुतिन यांचं पुढील टार्गेट असू शकतात, असंही यूलिया यांनी म्हटलंय.

'ब्लादिमीर पुतिन कधीही अणुबॉम्ब टाकू शकतात, 3 देशांना सर्वात मोठा धोका', जेलेन्स्की यांच्या माजी प्रवक्त्याचा दावा
ब्लादिमीर पुतीन, राष्ट्रपती, रशिया
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 7:28 PM

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) आज पाचवा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेलं हे भीषण युद्ध रोखण्यासाठी यूक्रेनसह जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत अद्याप दिसून येत नाहीत. अशावेळी अजून एक मोठी बातमी समोर आलीय. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) कोणत्याही क्षणी अणूबॉम्ब टाकू शकतात, असा मोठा दावा यूक्रेनचे राष्ट्रपती बोलिदिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचे माजी प्रवक्ते यूलिया मंडेल (Yulia Mendel) यांनी केलाय. इतकंच नाही तर यूक्रेनसह अन्य देशांवरही अणुबॉम्ब हल्ला होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुतिन आण्विक हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. पोलंड, मोल्डोआ आणि फिनलँड हे देश पुतिन यांचं पुढील टार्गेट असू शकतात, असंही यूलिया यांनी म्हटलंय. तर पोलंडमधील 74 टक्के लोकांचं मत आहे की पुतिन आण्विक हल्ला करु शकतात.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुनित यांनी रशियन न्युक्लिअर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर यात कुठलीही शंका नाही की ते दखल देतील आणि त्यांची हार होणार नाही. कोणताही देश आमच्यावर हल्ला करेल तर त्याला परिणान भोगावे लागतील, असा इशाराच पुतिन यांनी दिला होता. 1945 मधील दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत कोणत्याही देशाने अण्वस्त्रांचा उपयोग केलेला नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. त्याचे परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहे. त्या हल्ल्यात 2 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

पुढील 24 तास महत्वाचे

दुसरीकडे यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी रविवारी संध्याकाळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी बोलताना जेलेन्स्की म्हणाले की या युद्धात पुढील 24 तास खूप महत्वाचे आहेत. तर ब्रिटनकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, असं आश्वासन बोरिस जॉन्सन यांनी दिलंय.

ब्लादिमीर पुतिन यांचा जगाला इशारा

यूक्रेनच्या मुद्द्यावर आपण कुठल्याही परिणामांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं वक्तव्य पुतिन यांनी केलं आहे. पुतिन यांनी एकप्रकारे यूक्रेनला मदत करणाऱ्या कोणत्याही पश्चिमी देशांना आण्विक हल्ल्याचा इशाराच दिला आहे. शुक्रवारी NATO च्या 30 देशांनी चर्चा केली. असं असताना पुतिन यांनी कोणत्याही देशानं रशियाला निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला तर इतिहासात नोंद नसेल अशा परिणामांना सामोरं जावं लागेल असा निर्वाणीचा इशारा दिलाय.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : रशियाला रोखण्यासाठी युक्रेनचा मास्टर स्ट्रोक, जेलमधील कैदी उतरणार युद्धभूमिवर

बेलारूसची रशियाला मदत; रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार? युक्रेनचे टेन्शन वाढले

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.