Russia Attack On Ukraine : युक्रेन हादरलं, एकाचवेळी 100 ठिकाणी हल्ला, रशियाने अखेर सर्वात घातक TU-95 विमान वापरलं
Russia Attack On Ukraine : युक्रेन विरुद्ध युद्धात रशियाने अखेर TU-95 विमानाचा वापर केला आहे. मागच्या तीन वर्षातील सर्वात भीषण असा हल्ला रशियाने केला आहे. रशियाच्या या हल्ल्याला पलटवार म्हणून पाहिलं जात आहे.
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. युक्रेनच्या 100 ठिकाणांवर एकाचवेळी हल्ला केलाय. रशियाने अखेर TU-95 विमानाचा वापर केला. हे रशियाच अत्यंत घातक बॉम्बवर्षक विमान आहे. TU-95 मधून रशियाने क्रूज मिसाइल्स डागली. मागच्या तीन वर्षात रशियाने युक्रेनवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. रशियाच्या या हल्ल्याला पलटवार म्हणून पाहिलं जात आहे. मंगळवारी रात्री युक्रेनने रशियावर हल्ला केला होता.
रशियाच्या या हल्ल्यात कीवमधली डझनभरपेक्षा जास्त इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक इमारतींमध्ये हल्ल्यानंतर आग लागली. किती जिवीतहानी झालीय, त्याबद्दल युक्रेनने खुलासा केलेला नाही. रशियाने इस्कंदर मिसाइलने हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनच मोठ नुकसान झालय. रशियाने पहिला हल्ला सकाळी 6.30 वाजता केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण कीवमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. सतत सायरन वाजतायत. जीव वाचवण्यासाठी लोकांनी बंकरचा आसरा घेतला आहे.
जेलेंस्की काय म्हणाले?
रशियाच्या या हल्ल्यावर जेलेंस्कीची प्रतिक्रिया आली आहे. रशियाने 40 पेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. त्यात 30 मिसाइल्स नष्ट केल्याच ते म्हणाले. “शत्रुने युक्रेनच्या जनतेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला” असं युक्रेनचे ऊर्जा मंत्री हलुशेंको यांनी फेसबुकवर लिहिलय. त्यांनी, नागरिकांना धोका असल्यामुळे आश्रय स्थळांमध्ये राहण्याची विनंती केलीय.
क्रूज मिसाइल्सचा वापर
सरकारी ऊर्जा कंपनी उक्रेनेर्गोने खारकीव, सुमी, पोल्टावा, जापोरिज्जिया, निप्रॉपेट्रोस आणि किरोवोहराद क्षेत्रात आपातकालीन वीज कपातीची सूचना केलीय. कीवचे मेयर एंड्री सदोवी म्हणाले की, या हल्ल्यामध्ये क्रूज मिसाइल्सचा वापर करण्यात आला.
युद्ध कधीपर्यंत थांबेल
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण होत आली आहेत. मात्र, अजूनही हे युद्ध थांबलेलं नाही. उलट दिवसेंदिवस अजून भीषण हल्ले सुरु आहेत. युक्रेनला लढण्यासाठी अमेरिका आणि नाटो देशांकडून रसद पुरवली जात आहे. अमेरिकेत पुढच्या काही दिवसात डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे. कारण पुतिन आणि ट्रम्प यांचं नातं लक्षात घेता अमेरिकेकडून युक्रेनला मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे.