PM Modi Meet Putin : पीएम मोदी हसून त्यावेळी एवढच बोलले, पुतिन यांच्या प्रायवेट डिनरमध्ये काय घडलं?
PM Modi Meet Putin : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्टमध्ये नोवो-ओगरियोवो येथील आदिरातिथ्याबद्दल राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानले. पुतिन पीएम मोदी यांचं कौतुक करताना म्हणाले की, "तुम्ही तुमच संपूर्ण जीवन लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केलय आणि लोकांना हे जाणवतं"
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नोवो-ओगरियोवो या आपल्या सरकारी निवासस्थानी त्यांनी मोदी यांचं स्वागत केलं. दोन्ही नेत्यांची ही खासगी बैठक होती. देशाच्या प्रगतीसाठी जे कार्य केलय, त्या बद्दल त्यांनी मोदी यांचं कौतुक केलं. पुतिन यांच्या निवासस्थानी झालेली ही अनौपचारिक बैठक होती. तुम्ही तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालात, याबद्दल माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असं पुतिन म्हणाले. तुमच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं, माझ्या मते हा योगायोग नाही, तुम्ही अनेक वर्ष काम करताय, त्यामुळे हे शक्य झालय असं पुतिन म्हणाले.
रशियन राष्ट्रपती पुतिन म्हणाले की, “तुम्ही खूप ऊर्जावान व्यक्ती आहात. तुमचे स्वत:चे विचार आहेत. ज्यामुळे भारत आणि भारतीय लोकांच हित साध्य होतं” मोदींचा गौरव करताना पुतिन म्हणाले की, “तुम्ही तुमच संपूर्ण जीवन लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केलय आणि लोकांना हे जाणवतं” मॉस्कोच्या जवळच सरकारी निवासस्थानी चहापानाला दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
‘तुम्ही बरोबर बोलताय’
देशात झालेल्या निवडणुकांबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले की, ‘भारताच्या लोकांनी मला मातृभूमीची सेवा करण्याची संधी दिली आहे’ त्यावर पुतिन म्हणाले की, ‘तुम्ही तुमच संपूर्ण जीवन भारतीय लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केलं आहे’ पीएम मोदी हसून त्यावेळी पुतिन यांना म्हणाले की, ‘तुम्ही बरोबर बोलताय. माझं एकच लक्ष्य आहे. माझा देश आणि त्याची जनता’
मोदी-पुतिन डिनरच्या वेळच्या खास गोष्टी
पीएम मोदी पुतिन यांना भेटण्यासाठी त्यांचं प्रायवेट घर नोवो-ओगारेवो येथे गेले.
पाश्चिमात्य देश पुतिन यांना एकट पाडण्याचा प्रयत्न करतायत. त्याचवेळी मोदी-पुतिन यांची गळाभेट झाली.
पुतिन यांनी चाय पे चर्चा दरम्यान पंतप्रधान मोदींना खाण्यासाठी ताजी फळं, बादाम, सूका मेवा, खजूर आणि मिठाई दिली.
मोदी आणि पुतिन यांनी रशियाचा पारंपरिक हॉर्स शो पाहिला.
मोदी आणि पुतिन यांनी बॅट्री कारमधून पुतिन यांच्या प्राइवेट घराचा फेरफटका मारला. यावेळी पुतिन कार चालवत होते.
पीएम मोदी पुतिन यांना म्हणाले की, कुठल्या मित्राच्या घरी जाऊन भेटण्याचा आनंद होत आहे.
पुतिन पीएम मोदी यांना म्हणाले की, तुम्ही नेहमी देशाच्या फायद्याचा विचार करता आणि हेच तुमच्या तिसऱ्यांदा विजयी होण्यामागच कारण आहे.
पुतिन आणि पीएम मोदी यांच्या भेटी दरम्यान पुतिन यांच्या निवासस्थानी नार्थ कोरियन कुत्रा सुद्धा दिसला. किम जोंग उन यांनी पुतिन यांना मागच्या महिन्यात गिफ्ट केला होता.
पहिल्यांदा पुतिन यांच्या प्रायवेट रेसिडेंसचे काही फोटो समोर आले. मॉस्कोच्या हद्दीबाहेर पुतिन यांचं हे निवासस्थान असून चारही बाजूला जंगल आहे. तिथे एयर डिफेंस सिस्टम तैनात आहे. अणवस्त्र हल्ल्यापासून वाचवणाऱ्या बंकरही तिथे असल्याच बोललं जातं.