Ukraine: रशियन सैनिकांकडून युक्रेनी मुलींवर बलात्कार व हत्या, मृतदेहांवर लावले जातायत स्वस्तिकचे निशाण; युक्रेनच्या महिला खासदारांचा आरोप
युक्रेन-रशियातील युध्द (Ukraine Russia War) सुरुच आहे. या युध्दाची तीव्रता स्पष्ट करताना युक्रेनच्या एका महिला खासदाराने रशियाच्या सैनिकांवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी सांगितले, की रशियन सैनिक दहा वर्षांच्या मुलींवरदेखील बलात्कार करुन त्यांची हत्या करीत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युध्दाची (russian ukrain War) धग कायम आहे. युक्रेन व रशियाच्याच्या युध्दातून रोज नवनवीन व भयंकर माहिती समोर येत आहे. दोघ देश एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. यातच आता युक्रेनच्या महिला खासदार असलेल्या लीजिया वासिलेंक (lesia vasylenk) यांनी रशियन सैनिकांवर एक धक्कादायक आरोप केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट करत सांगितले, की रशियन सैनिक युक्रेनच्या मुलींवर बलात्कार करीत आहेत. त्यानंतर त्यांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहावर जळते स्वस्तिकच्या आकाराचे निशान लावत आहेत. बलात्कार करताना अगदी 10 वर्षांच्या मुलींनाही रशियन सैनिक सोडत नसल्याचा गंभीर आरोप लीजिया यांनी केला आहे. रशियन सैनिक (russian soldiers) युक्रेमध्ये हत्या व लुट करत असल्याचेही त्या आपल्या सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हणतात.
लीजिया यांनी आपल्या दुसर्या एका ट्वीटमध्ये म्हटलेय, की रशियन सैनिक युक्रेनमध्ये लुटमार, बलात्कार आणि हत्या करीत आहे. 10 वर्षांच्या मुलींवरदेखील ते बलात्कार करीत आहेत. महिलांच्या मृतदेहांवर जळते स्वस्तिकचे निशान लावत आहेत. त्यांच्या दाव्यानुसार रशियन सैनिकांनीच हे केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी जळत्या स्वस्तिकाचे निशान असलेला फोटा शेअर केला आहे. त्यात, त्या म्हणतात, की ‘या महिलेचा बलात्कार होउन तिची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर जळते स्वस्तिकचे निशान तिच्या मृतदेहावर उमटवण्यात आले आहे. मी या फोटोमुळे चिंताग्रस्त आणि प्रचंड संतापली आहे. या फोटोला पाहून मी कोणत्या शब्दात माझा राग व्यक्त करु, मला समजत नाही.’
लिबरल होलोस पक्षाच्या नेत्या आहेत लीजिया
लीजिया वासिलेंक या युक्रेनच्या लिबरल होलोस पक्षाच्या नेत्या आहेत. लीजिया युक्रेन व रशिया युध्दाबाबत सलग विविध ट्वीटच्या माध्यमातून अचंबित करणारी माहिती शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून युक्रेन व रशिया यांच्यातील युध्दाची धग कायम आहे. युक्रेनवर रशियाकडून होत असलेल्या अत्याचारांबाबत अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना लीजिया यांचे हे ट्वीट चर्चेत आले आहे.
पहा ट्विट-
Russian soldiers loot, rape and kill. 10 y.o. girls with vaginal and rectal tears. Women with swastika shaped burns. Russia. Russian Men did this. And Russian mothers raised them. A nation of immoral criminals
— Lesia Vasylenko (@lesiavasylenko) April 3, 2022
Tortured body of a raped and killed woman. I’m speechless. My@mind is paralyzed with anger and fear and hatred. #StopGenocide #StopPutinNOW pic.twitter.com/Kl0ufDigJi
— Lesia Vasylenko (@lesiavasylenko) April 3, 2022
बूचावर रशियन सैनिकांचा होता ताबा
बूचा हे शहर पुर्वी रशियाच्या ताब्यात होते. त्यानंतर या शहरातून रशियन सैनिक मागे हटल्यानंतर युक्रेनच्या सैनिकांनी या ठिकाणी ताबा घेतला. हे ठिकाणी युक्रेनची राजधानी किवच्या जवळच आहे. एका रिपोर्टनुसार, रशियन सैनिक युक्रेनच्या सामान्य जनतेवर अनेक अत्याचार करीत आहेत. महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या केली जात आहे. या आरोपांवर आता क्रेमलिन (रशियन राष्ट्रपतींचे कार्यालय) कडूनही प्रतिउत्तर आले आहे. त्यांनी या सर्व आरोपांचे खंडण केले आहे. युरोपीय आयोगाच्या प्रमुख उर्सुला वान डेर लेयेन यांनी सांगितले, की युरोपयी संघ युध्द दोषींविरुध्द पुरावे गोळा करण्यासाठी एक शोधकर्त्यांची टीम लवकरच पाठविणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा:
Russia Ukraine war : काय बोलता! युद्ध ठरलं वरदान, काही देशांची 8 वर्षांची मंदी संपली