लसींचा तुटवडा संपणार, रशियाची स्पुतनिक वी लस भारताला ‘या’ दिवशी मिळणार
रशियाच्या स्पुतनिक वी लसीची पहिली खेप भारतला 1 मे रोजी मिळेल, अशी माहिती आहे. Russian vaccine sputnik v
नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना भारताला करावा लागत आहे. देशभरात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याला भारताला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काही दिवसांपूर्वी रशियाच्या स्पुतनिक वी (Sputnik V ) या लसीला भारतात मंजुरी दिली आहे. स्पुतनिक वी लसीची पहिली खेप भारतला 1 मे रोजी मिळेल, अशी माहिती रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रिक यांनी दिली आहे.(Russian vaccine sputnik v first batch of corona vaccine will arrive on may 1 at India)
भारतीय निर्मात्यांशी करार
मिळालेल्या माहितीनुसार रशियानं भारताला कोरोना लस पुरवठ्याबाबत करार केला आहे. त्यानुसार एका वर्षात भारताला लसीचा पुरवठा होणार आहे. रशियानं पाच भारतीय उत्पादकांशी याबाबत करार केला आहे. रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख दिमित्रिक यांच्या माहितीनुसार 50 दशलक्ष डोस येत्या काही दिवसात भारताला दिले जातील. स्पुतनिक वी लसीचे भारताला 85 कोटी डोस मिळण्याची शक्यता आहे.
भारतात कोरोना विषाणूचे 3 लाख 23 हजार नवे रुग्ण
भारताला कोरोना विषाणू संसर्गातून थोडा दिलासा मिळाला आहे.गेल्या 24 तासांमध्ये भारतात 3 लाख 23 हजार 144 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 2 लाख 51 हजार 827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 76 लाखांवर
कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झाल्यापासून भारतात आतापर्यंत 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर, आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 56 हजार 209 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.
India reports 3,23,144 new #COVID19 cases, 2771 deaths and 2,51,827 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,76,36,307 Total recoveries: 1,45,56,209 Death toll: 1,97,894 Active cases: 28,82,204
Total vaccination: 14,52,71,186 pic.twitter.com/ynq5OSrzCT
— ANI (@ANI) April 27, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO | आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही वेळ मिळेना, गाडीतच बसून राजेश टोपेंचा अल्पोपहार
Covid Vaccine Update | मुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर?
(Russian vaccine sputnik v first batch of corona vaccine will arrive on may 1 at India)