रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन मेले आहेत, तोतया करतोय रशियाच्या सत्तेवर राज्य, ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या अधिकाऱ्यांचा दावा
पुतिन यांच्या सहकाऱ्यांच्या त्यांच्या मृत्यूचे रहस्य जगापासून काही आठवडे किंवा काही महिने गुप्त ठेवण्याची इच्छा आहे, असेही ब्रिटीश गुप्तचर यंत्रणांतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच असेही सांगण्यात येते आहे की, पुतिन यांचे काही सार्वजनिक कार्यक्रम त्यांच्या मृत्यूपूर्वीच रेकॉर्ड करुन ठेवण्यात आले आहेत, तेच आता त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून जगासमोर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पुतिन यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाने त्यांची जागा आता घेतली आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
मास्को-लंडन– रशियाचे (Russia)राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) हे एक गूढ आहे. केजेबीचे माजी गुप्तहेत ते राष्ट्राध्यक्ष हा त्यांचा प्रवास रहस्यांनी भरलेल्या जीवनाचा आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्य, प्रकृती आणि त्यांची रणनीती याबाबत काही मोजक्याच व्यक्तिंना माहिती असते. त्यांच्या आजारपणाबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा सध्या चर्चेत आहेत. त्यातच इंग्लंडच्या गुप्तचर यंत्रणेने (Britain’s intelligence agency)एक धक्कादायक दावा केला आहे. या दाव्यानुसार व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू यापूर्वीच झालेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी त्यांच्यासारखाच दिसणारी व्यक्ती किंवा त्यांचा तोतया सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्याऐवजी वावरत आहे, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. पुतिन यांच्या सहकाऱ्यांच्या त्यांच्या मृत्यूचे रहस्य जगापासून काही आठवडे किंवा काही महिने गुप्त ठेवण्याची इच्छा आहे, असेही ब्रिटीश गुप्तचर यंत्रणांतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच असेही सांगण्यात येते आहे की, पुतिन यांचे काही सार्वजनिक कार्यक्रम त्यांच्या मृत्यूपूर्वीच रेकॉर्ड करुन ठेवण्यात आले आहेत, तेच आता त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून जगासमोर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पुतिन यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाने त्यांची जागा आता घेतली आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
क्रेमनिल या तोतयाचा वापर करीत असल्याचा दावा
गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतीन सध्या बरेच आजारी आहेत आणि अशा स्थितीत जर त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मृत्यू काही आठवडे किंवा काही महिने गुप्त ठेवण्यात येणार आहे. त्यांचा यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचीही शक्यता आहे. मात्र वास्तव काय आहे, याची माहिती काढणे अवघड आहे. पुतिन हे जेव्हा आजारी होते तेव्हापासूनच त्यांच्या तोतयाचा वापर करण्यात येत होता. आता त्यांच्या मृत्यूनंतरही क्रेमनिल हेच करत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. पुतीन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट होता आणि तो त्यांच्याशी प्रामाणिक होता, त्यांच्याकडूनच हे सारे करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते आहे.
मृत्यूचं रहस्य कशासाठी, गुप्तचर यंत्रणांनी सांगितले
पुतिन यांच्या मृत्यूची बातमी बाहेर आली तर रशियात सत्तापालट होण्याची शक्यता आहे, आणि हीच भीती त्यांच्या नीकटवर्तीयांना वाटते आहे. असे झाल्यास रशियाचे जनरल युक्रेनमधून सैन्यमाघारीचा आदेश देतील. पुतीन यांच्या नीकवर्तीयांचे स्थानही यामुळे कोलमडणार आहे आणि त्यांना सत्तेतून बाहेर व्हावे लागेल. ही भीतीही त्यांच्या मनात आहे. जागतिक पातळीवरही युक्रेनमधून सैन्य माघारी झाल्यास रशियाची नाचक्कीच होणार आहे, अशी स्थितीत पुतिन जिवंत आहेत, हा भास निर्माण करणेच अधिक चांगले आहे. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. दोन आठवड्यापूर्वी रशियातील एका अब्जावधी व्यापारी आणि क्रेमनिल यांच्या नीकटवर्तीयांनी हा दावा केला होता की पुतिन सध्या ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत. युक्रेनरील हल्ल्यापूर्वी त्यांचे ऑपरेशन झाले असेही सांगण्यात आले होते.
यापूर्वीही आल्या होत्या पुतिन यांच्या प्रकृती अस्वस्थ्याच्या बातम्या
पुतिन यांच्या आजारपणामुळे त्यांची सत्तेवरील पकड ढिली होत असल्याचेही एमआय६च्या एजेंटने सांगितले आहे. इंग्लंडच्या गुप्तचर यंत्रणेतील माजी गुप्तहेर क्रिस्टोफर स्टील यांनी असा दावा केला आहे की, प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुतीन यांची सत्तेवरील पकड कमी होत आहे आणि पुतिन क्रेमोलिनला अव्यवस्था आणि अराजकतेच्या दरीत लोटत आहेत. तर एमआय६चे एजेंच स्टीन यांनी दावा केला आहे की, पुतिन यांना उपचारासाठी सातत्याने काम थांबवावे लागते आहे, त्यामुळे मॉक्सोत प्रभावी असलेले स्पष्ट राजकीय नेतृत्व सूर्तास अस्तित्वात नाही.