Salman Rushdie Attack : तो वाद काय आहे ज्यामुळे सलमान रश्दींच्याविरोधात फतवा काढला गेला; इराण कनेक्शन काय?
Salman Rushdie Attack : रश्दींच्या या पुस्तकांचा जपानी भाषेत अनुवाद करणाऱ्या हितोशी इगाराशी यांची हत्या करण्यता आली होती. तर इटालियन भाषेत हल्ला करणाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या पुस्तकाच्या प्रकाशकालाही टार्गेट करण्यात आलं होतं.
न्यूयॉर्क : भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie Attack) यांच्यावर अमेरिकेत हल्ला करण्यात आला. एका कार्यक्रमात लेक्चर देण्यासाठी उभे राहिले असता एका 24 वर्षीय युवकाने मंचावर येऊन रश्दींना आधी धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने रश्दी यांच्या मान आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे रश्दी जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले. त्यांच्या हाताच्या नसा तुटल्या आहेत. यकृतालाही जखमा झाल्या आहेत. सर्जरी केल्यावर त्यांचा डोळा निकामी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी (New York Police) याप्रकरणी एका 24 वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे. हादी मातर (Hadi Matar) असं या हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. रश्दी यांच्यावर झालेला जीवघेणी हल्ला आणि या तरुणाच्या अटकेनंतर इराणची चर्चा सुरू झाली आहे. या हल्ल्याचं इराणशी काय कनेक्शन आहे, त्यावर टाकलेला हा प्रकाश.
सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर इराण अचानक चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. रश्दी यांना मिडनाईट्स चिल्ड्रन या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार देण्यात आला होता. बुकर पुरस्कार जिंकल्यानंतर रश्दी यांनी द सॅटेनिक वर्सेज ही कादंबरी लिहिली होती. 1988 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीमुळे अचानक वाद निर्माण झाला होता. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह खुमैनी यांनी या पुस्तकातून इस्लामचा अपमान करण्यात आल्याचं सांगत रश्दी यांच्याविरोधात फतवा काढला होता.
23 कोटींचं बक्षीस
सलमान रश्दी यांना जीवे मारण्यासाठी खुमैनी यांनी बक्षीस जाहीर केलं होतं. रश्दी यांना जीवे मारणाऱ्याला 3 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 23,88,90,000 रुपये बक्षीस देणार असल्याची घोषमा खुमैनी यांनी केली होती. खुमैनी यांच्या या फतव्याचा एक दोन नव्हे तर 13 देशात परिणाम पाहायला मिळाला. त्यानंतर रश्दी यांना जीवे मारण्याच्या अनेकदा धमक्या आल्या.
1989मध्ये आलेल्या या फतव्यानंतर रश्दी यांना नऊ वर्ष लपूनछपून राहावं लागलं होतं. त्यानंतर इराण सरकारने एक निवेदन जारी केलं होतं. रश्दी यांना ठार मारण्याच्या खुमैनी यांच्या विधानाचं आम्ही समर्थन करत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, 2012मध्ये इराणच्या एका संघटनेने रश्दी यांना जीवे मारण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या रकमेत वाढ केली होती. रश्दी यांना जीवे मारणाऱ्याला 3.3 मिलियन डॉलर म्हणजे 26,27,79,000 रुपये देण्यात येणार असल्याचं या संघटनेने जाहीर केलं होतं.
कादंबरी वादग्रस्त का ठरली?
सलमान खान यांच्या द सॅटेनिक वर्सेज या पुस्तकाच्या खरेदी आमि विक्रीवर भारतासह अनेक देशात बंदी आहे. या पुस्तकातून रश्दी यांनी मोहम्मद पैगंबरांचा अपमान केल्याचं सांगत हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. अनेक देशात आंदोलने करण्यात आली होती. रश्दी यांची कादंबरी जाळण्यात आली होती. तेव्हा भारतात राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील सरकरा होतं. राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारने रश्दींच्या पुस्तकाच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली होती.
अनुवाद करणाऱ्याची हत्या
मुस्लिम धर्म आणि परंपरांवरही रश्दी यांनी या पुस्तकातून वादग्रस्त लिखाण केल्याचं सांगितलं जात आहे. हे पुस्तक बाजारात आल्यानंतर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह खुमैनी यांनी रश्दींच्या विरोधात फतवा काढला होता. तसेच या कादंबरीचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणाऱ्यांनाही टार्गेट करण्यात आलं होतं. रश्दींच्या या पुस्तकांचा जपानी भाषेत अनुवाद करणाऱ्या हितोशी इगाराशी यांची हत्या करण्यता आली होती. तर इटालियन भाषेत हल्ला करणाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या पुस्तकाच्या प्रकाशकालाही टार्गेट करण्यात आलं होतं.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणची चर्चा होत आहे. अटक करण्यात आलेला तरुण अमेरिकेच्या न्यूजर्सीचा राहणारा आहे. रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा पोलिसांसह एफबीआयही तपास करत आहेत. अजूनपर्यंत हल्लेखोराचा हल्ला करण्यामागचा हेतू पोलिसांना समजलेला नाही.