Saudi Arabia : सौदी अरेबियात 81दहशतवाद्यांना एकाच वेळी फाशी, 42 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
कोरोना (Corona) संसर्गाच्या काळात सौदी अरेबियात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची संख्या कमी झाली होती. सौदी अरेबियातील सरकारी सौदी प्रेस एजन्सीच्या माहितीनुसार 81 जणांना फाशी देण्यात आली.
नवी दिल्ली : सौदी अरेबियात (Saudi Arabia) शनिवारी दहशतवादी कारवायांसदर्भात दोषी असलेल्या 81 गुन्हेगारांना फाशी देण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या आधुनिक इतिहासातील ही पहिली घटना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांना फाशी देण्याची गेल्या 42 वर्षातील ही पहिली घटना आहे. 1979 मध्ये मक्कामधील ग्रँड मशिदीवर कब्जा मिळवल्याच्या कारणामुळं दोषी ठरलेल्या 63 दहशतवाद्यांना (Terrorist) फाशी जानेवारी 1980 मध्ये देण्यात आली होती. सौदी अरेबियानं दहशतवाद्यांना फाशी देण्यासाठी शनिवार का निवडला यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. कोरोना (Corona) संसर्गाच्या काळात सौदी अरेबियात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची संख्या कमी झाली होती. सौदी अरेबियातील सरकारी सौदी प्रेस एजन्सीच्या माहितीनुसार 81 जणांना फाशी देण्यात आली.
निरपराध स्त्री, पुरुष आणि लहान मुला मुलींची हत्या केल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. या गुन्हेगारांना दोषी ठरवण्यात आलं होतं. सौदी अरेबियाननं फाशी दिलेल्या दहशतवाद्यांमध्ये अल कायदा, इस्लामिक स्टेट आणि येमेनच्या हूती बंडखोरांचं समर्थन करणाऱ्या लोकांचा समावेश होता.
फाशी कुठं दिली हे अस्पष्ट
सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वातील सैन्य येमेनमध्ये इराणच्या समर्थानातील हुती बंडखोरांविरोधात 2015 पासून लढत आहे. येमेनमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त सरकार स्थापन करण्याचा सौदी अरेबियाचा प्रयत्न आहे. सौदी अरेबियानं ज्यांना फाशी दिलीय त्यांच्याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. याशिवाय फाशीची शिक्षा कोणत्या ठिकाणी देण्यात आली हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही. संबंधित गुन्हेगारांना सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार वकिलाची मदत घेण्याची मुभा देण्यात आली होती.
गंभीर गुन्ह्यातील दोषी
सौदी अरेबियाकडून 81 दहशतवाद्यांना फाशी देताना सर्व कायदेशीर प्रक्रियांचं पालन केल्याची माहिती आहे. फाशी दिलेल्यांमध्ये काही गंभीर गुन्ह्यात दोषी आढळले होते. सौदी अरेबिया दहशतवादाविरोधात आणि संपूर्ण जगातील स्थैर्याला बाधा पोहोचवणाऱ्या कट्टरपंथी विचारधारांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सौदी अरेबियात या गुन्हेगारांना कशा प्रकारे फाशी देण्यात आली हे देखील सांगण्यात आलेलं नाही.
ट्विट
Saudi Arabia executes 81 people in one day for terror offences, reports AFP News Agency quoting state media
— ANI (@ANI) March 12, 2022
इतर बातम्या:
देवेंद्रजींना हात लावल्यास महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय… भाजप आमदाराचा इशारा