तेल सोडा सौदी अरेबियाच्या हाती लागला नवा खजिना, अशी करणार आता कमाई

सौदी अरेबियात तेलाच्या खाणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. पण तुम्हाला माहित आहे का सौदी अरेबियाने आता तेलावर अवलंबून न राहता देशासाठी आणखी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यात त्यांना मोठे यश देखील मिळाले आहे. कोणते आहे ते क्षेत्र जाणून घ्या.

तेल सोडा सौदी अरेबियाच्या हाती लागला नवा खजिना, अशी करणार आता कमाई
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 6:04 PM

रियाध : तेलाच्या साठ्यासाठी जगभारत प्रसिद्ध भरलेल्या सौदी अरेबियाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सौदी अरेबियाच्या पर्यटन उद्योगाने मोठी कमाई केली आहे. इतकंच नाही तर त्यांना आतापर्यंतचे सर्व कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. सौदी अरेबियाच्या सेंट्रल बँकेने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 2023 मध्ये, देशाला पर्यटकांच्या माध्यमातून $36 अब्ज डॉलरची कमाई झालीये. जो एक नवीन विक्रम आहे.

सौदी अरेबियाने आतापर्यंत कमवललेल्या इतिहासातील ही सर्वोच्च वाढ आहे, जी 2022 च्या तुलनेत 42.8 टक्के अधिक आहे. सौदीचे राजकुमार यांनी 2030 पर्यंत देशाला तेलावर अवलंबून न राहता इतर गोष्टींवर देखील काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच ते आता पर्यटनाला भरपूर प्रोत्साहन देत आहेत.

सौदी अरेबिया जागतिक पर्यटनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. यासोबतच त्यांचा संयुक्त राष्ट्रांच्या यादीतही समावेश झाला आहे. सौदी अरेबियातील पर्यटकांची संख्या तब्बल ५६ टक्क्यांनी वाढली आहे. सौदी अरेबियाच्या या यशाचे अनेकांनी कौतूक केले आहे. सौदी अरेबियाला 2023 पर्यंत 100 दशलक्ष देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याची अपेक्षा आहे. सौदी अरेबियाचे धोरण आणि प्रयत्न यामुळे हे मोठे यश मिळाले आहे. 2019 च्या तुलनेत देशातील पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत.

हज आणि उमराहमधून विक्रमी कमाई

सौदी अरेबिया आपल्या व्हिजन 2030 अंतर्गत देशातील पर्यटनाला चालना देत आहेच पण आता ते हज आणि उमराहच्या माध्यमातून देखील उत्पन्नावर भर देत आहेत. कारण जगभरातून मुस्लीम लोकं येथे येतात. सौदी अरेबियाने हज सुविधांचा विस्तार करण्यासाठी 21 अब्ज डॉलरहून अधिक खर्च केले आहेत. भारतासह जगभरातून लाखो लोक दरवर्षी हज आणि उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात. सौदी अरेबियाने 2019 मध्ये मक्का आणि मदिना येथे हज आणि उमराहमधून 12 अब्ज डॉलरची कमाई केली आहे आणि ती आता 30 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.