नव्या वर्षाचा दुसरा मोठा भूकंप, जपान हादरले, भूकंपानंतर सुनामीचा इशारा

जपानच्या हवामान खात्या्च्या माहिती नुसार स्थानिक वेळे नुसार रात्री ९.१९ वाजता हा भूकंप आला. या भूकंपाचे क्रेंद दक्षिण- पश्चिम बेटाच्या क्यूशूय येथे होते. या बेटावर राहणार्‍या लोकांना सुनामी लाटेच्या इशारा दिला आहे.

नव्या वर्षाचा दुसरा मोठा भूकंप, जपान हादरले, भूकंपानंतर सुनामीचा इशारा
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 7:41 PM

जपानच्या क्युशू बेटावर ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप आला आहे. भूकंपानंतर जपानमध्ये सुनामी येण्याचा इशारा देण्यात आल्याने लोक समुद्र किनाऱ्यापासून हटले आहेत. यंदाच्या नवीन वर्षांचा २०२५ चा हा दुसरा भूकंप आहे. याआधी भारताचा शेजारील देश तिबेटमध्ये भूकंपाने १०० हून अधिक लोक ठार झाले होते. जपान हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार दक्षिण-पश्चिम जापानमध्ये भूकंपाचे मोठे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल आहे. आतापर्यंत या भूकंपाच्या हादऱ्याने झालेल्या नुकसानाची माहिती मिळालेली नाही.

आधी तिबेटमध्ये भूकंपाचे तांडव

या आधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ७ जानेवारी रोजी तिबेटच्या एव्हरेस्टच्या पायथ्याच्या परिसरातील गावातील एक हजार घरे भूकंपाने भूईसपाट झाली होती. ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाने १२६ लोकांचा मृत्यू तर १८८ लोक जखमी झाले होते. तीस हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित जागी हलविण्यात आले. शिगात्सेमध्ये तीन हजार ६०९ इमारती नष्ट झाल्या होत्या. हा भूकंप तिबेटच्या डिंगरी काऊंटी येथे आला होता.

तिबेटच्या एव्हरेस्ट पर्वताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एव्हरेस्ट शिखरापासून ८० किमीवर असलेल्या डिंगरी गावातील एक हजार घरे कोसळली होती. त्यानंतर बचाव मोहित सुरु करण्यात आली होती. या भूकंपाचे झटके तिबेट सह नेपाळ, भूतान आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी जाणवले होते.

हे सुद्धा वाचा

जपानमध्ये इतके भूकंप का येतात ?

जपान देश पॅसिफिक बेसिनमध्ये येतो. येथे टेक्टोनिक प्लेट्सची एकमेकांशी टक्कर हेत राहतात. या भागाला ‘रिंग ऑफ फायर’ म्हणून ओळखले जाते. हा भाग ज्वालामुखी आणि भूकंपांचे सर्वात सक्रिय क्षेत्र म्हणूनही घोषीत केलेला आहे. या प्लेट्सच्या टक्करीमुळे भूकंप होतात.

साल २००४ मध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी

जपानच्या इतिहासातील भूकंपातून झालेल्या मोठ्या जीवितहानीच्या भयानक रेकॉर्ड आहे. साल २००४ मध्ये झालेल्या या भूकंपानंतर सुनामी लाट उसळून हजारो लोकांचे बळी गेले होते. जगाच्या इतिहासातील मोठ्या हानी पैकी ही घटना ओळखली जाते.

अशी घरे जपानमध्ये बांधली जातात

जपानला वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत असतात. त्यामुळे जपान घरे आणि इमारती भूकंपरोधक मटेरियल पासून बनविली जातात. घराचा पाया हा स्थिर नसतो. त्यामुळे हा पाया भूकंपाचा हादरा सहन करुन मजबूत उभा राहातो. त्यामुळे इमारत कोसळली तरी प्राणहानी अत्यंत कमी होते. त्यामुळे जपानच्या घरांना कोणतेही नुकसान होते. भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या इमारतींची उभारणी केली जाते.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.