शेख हसीना पुढील 48 तासात भारत सोडणार, पाहा कोणत्या देशात घेणार आश्रय?

बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. यापूर्वी त्या लंडनला जाण्याची शक्यता होती पण ब्रिटनने त्यांना अजून परवानगी दिलेली नाही. अमेरिकेनेही त्यांचा व्हिजा रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यापुढे कोणत्या देशांचा पर्याय आहे जाणून घ्या.

शेख हसीना पुढील 48 तासात भारत सोडणार, पाहा कोणत्या देशात घेणार आश्रय?
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 9:23 PM

Bangladesh Crisis : बांगलादेशातील हिंसाचारानंतर शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले. त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतलाय. माजी पंतप्रधान शेख हसीना येत्या ४८ तासांत भारत सोडू शकतात. याआधी ते लंडनला जाणार असल्याची चर्चा होती. पण यूके सरकारने त्यांच्या देशात आश्रयसाठी कोणताही नियम नसल्याचे सांगून अप्रत्यक्षरित्या नकार दिलाय. दुसरीकडे अमेरिकेनेही त्यांचा व्हिजा रद्द केला आहे. त्यामुळे अमेरिकेला जाण्यासाठी त्यांचे दरवाजे बंद झाले आहेत. आता त्या युरोपला जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे.  मात्र, त्या युरोपमधील कोणत्या देशात जातील याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सध्या शेख हसीना या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर सुरक्षित आहेत. सध्या त्यांना भारताने आश्रय दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेख हसीना आता युरोपात जाणार असल्याचं कळतंय. याशिवाय इतर देशांशीही चर्चा सुरू आहे. त्या रशियातही आश्रय घेऊ शकतात अशी ही चर्चा आहे.

शेख हसीना यांना भारताकडून संपूर्ण सुरक्षा दिली जाणार आहे. त्यांच्या जाण्याची व्यवस्थाही भारत करणार असल्याचं बोललं जात आहे. शेख हसीना यांना भारतात सोडण्यासाठी जे विमान आले होते ते बांगलादेश हवाई दलाचे होते आणि ते परत गेले आहे. अशा परिस्थितीत त्या आता ज्या देशात जातील त्यांना भारत सरकार व्यवस्था करुन देणार आहे.

फिनलंड किंवा रशिया?

शेख हसीना यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सर्व व्यवस्था भारताकडून केली जाणार आहे. सोमवारी संध्याकाळी त्या भारतात पोहोचल्या होत्या. शेख हसीना या फिनलंड आणि रशियासारख्या काही देशांशी बोलत आहेत. त्यांच्या पुढील परदेश दौऱ्यावर भारत त्यांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्थाही करेल. यापूर्वी त्यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण यूकेने त्यांना हिरवा कंदील अजून दिलेला नाही.

एका वृत्तात असे म्हटले आहे की, “बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बहीण शेख रेहानासोबत तात्पुरता आश्रय घेण्यासाठी भारतातून लंडनला जाण्याचा विचार करत होते, परंतु यूके सरकारने त्यांना अजून परवानगी दिली नाही. त्यामुळे आता त्यांना दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागणार आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी जायचे आहे.

रेहाना यांची मुलगी ट्युलिप सिद्दीक ही ब्रिटीश पार्लमेंटची सदस्य असल्याने हसीना यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला होता. ट्यूलिप या ट्रेझरीचे आर्थिक सचिव आणि हॅम्पस्टेड आणि हायगेटसाठी कामगार खासदार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.