धक्कादायक, ज्या बँकेत काम करत होती, तिथूनच चोरले 68 कोटी, प्रायव्हेट जेटने थेट परदेशात.. तिजोरीत पैशांच्या जागी ठेवली रद्दी

2018 साली इनेसाने ट्यूमेनच्या सायबेरिन बँक ऑफ रीकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या बँकेच्या तिजोरीतून सुमारे 67 कोटी 49 लाख रुपये चोरले. तिजोरीत तिने स्टेशनरीचे सामान ठेवले. हा प्रकार उघडकीस येईपर्यंत, ती एका प्रायव्हेट जेटने देशातून पळूनही गेली होती. आता चार वर्षांनंतर तिला स्पेनमध्ये पकडण्यात आले असून तिला पुढील कारवाईसाठी रशियात परत आणण्यात आले आहे.

धक्कादायक, ज्या बँकेत काम करत होती, तिथूनच चोरले 68 कोटी, प्रायव्हेट जेटने थेट परदेशात.. तिजोरीत पैशांच्या जागी ठेवली रद्दी
बँकेतून चोरले 68 कोटी Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 7:46 PM

नवी दिल्ली – ज्या बँकेत वर्षानुवर्षे काम करत होती, त्याच बँकेची फसवणूक करण्याचा कारनामा एका महिला कर्मचाऱ्याने केला आहे. यात तिने तिच्या एका साथीदाराचीही मदत घेतली आहे. तिने या बँकेतून सुमारे 68  कोटी रुपये चोरण्याचा (68 crore stole)पराक्रम केला, अतकंच नाही तर तिजोरीत या पैशांच्या ऐवजी तिने रद्दीचे पेपर ठेवले होते. हे सगळं केल्यानंतर ही महिला कर्मचारी (woman employee)एका प्रायव्हेट जेटने (Private jet)दुसऱ्या देशात पळून गेली. या सगळ्या प्रकाराला चार वर्ष उलटल्यानंतर आता या आरोपी महिलेला पुन्हा आपल्या देशात आणण्यात आले आहे. हे प्रकरण रशियातील आहे. स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, इनेसा ब्रांडेनबुर्ग असं या आरोपी महिलेचे नाव आहे. इनेसा केवळ बँकेची क्रमचारीच नव्हती तर ती बँकांच्या मालकांपैकी एक होती. तिचा साथीदारही बँकेच्या संचालक मंडळांपैकी एक सदस्य होता. दोघेही बँकेचे वरिष्ठ अधिकारी असल्याने, त्यांच्याबाबत सुरुवातीला कुणीच संशय घेतला नाही. 2018 साली इनेसाने ट्यूमेनच्या सायबेरिन बँक ऑफ रीकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या बँकेच्या तिजोरीतून सुमारे 67 कोटी 49 लाख रुपये चोरले. तिजोरीत तिने स्टेशनरीचे सामान ठेवले. हा प्रकार उघडकीस येईपर्यंत, ती एका प्रायव्हेट जेटने देशातून पळूनही गेली होती. आता चार वर्षांनंतर तिला स्पेनमध्ये पकडण्यात आले असून तिला पुढील कारवाईसाठी रशियात परत आणण्यात आले आहे.

या लुटीत इनेसा एकटी नव्हती

बँकेच्या तिजोरीत पैशांऐवजी कागदांचे तुकडे ठेवण्यात आले आहेत, हे क्लार्कच्या लक्षात आल्यानंतर हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आले, तपासात इनेसानेच पैशांऐवजी कागदे ठेवल्याचे समोर आले. हे पैसे बॅगेत भरुन ती पळून गेली होती. तिचा शोध गेल्या चार वर्षांपासून सुरु होता. या लुटीत इनेसाचा एकटीचा सहभाग नव्हता. यात बँकेचा सहसंस्थापक आणि संचालक मंडळातील सदस्य रोमान्यता हाही सहभागी होता. या प्रकरणात यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांला जेलमध्ये पाठवण्यात आलेले आहे. इनेसावर यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्या प्रकरणावर रशियात सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

रोमान्यता होता मास्टरमाईंड

या संपूर्ण लूटमारीच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड रोमान्यता होता, असे सांगण्यात येते आहे. त्यानेच इनेसाची नियुक्ती बँकेच्या गुंतुवणूकदारांच्या बोर्डाच्या उपाध्यक्षपदी केली होती. तिजोरीत प्रवेश मिळवण्यासाठी हे करण्यात आले होते. इनेसानेही आपल्या अधिकारपदाचा फायदा घेत पैशांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.