धक्कादायक, 33 वर्षीय तरुणाला अंडाशय आणि गर्भाशय असल्याचे उघड, 20 वर्षांपासून येत होती मासिक पाळी
तपासात हे समोर आले ती त्या तरुणाच्या शरिरारत अंडाशय आणि गर्भाशय असून, त्याला २० वर्षांपासून मासिक पाळी येत होती. म्हणजेच शारिरिक पातळीवर हा तरुण पुरुष नव्हताच तर स्त्री होता.
बिजिंग – एका तरुणाला काही दिवसांपासून लघवी (Urine)करण्यात अडचणी येत होत्या. नेहमी रक्त येत असे. यावर उपचार करण्यासाठी तो डॉक्टरकडे पहोचला. डॉक्टरने तपासणी करुन जे सांगितलं त्याने तो तरुण बेशुद्ध पडण्याच्याच बेतात होता. खरंतर डॉक्टरांनी त्याला तपासणीनंतर सांगितलं की तो पुरुष नसून स्त्री आहे आणि त्याच्या शरिरात गर्भाशय (uterus)आहे. ही धक्कादायक घटना चीनच्या (China)सिचुआन प्रांतात घडली आहे. जिथे एका तरुणाला वयाच्या 33 व्या वर्षी डॉक्टरांनी सांगितले की तू पुरुष नसून स्त्री आहेस. त्यांच्या शरिराच्या आतल्या भागात स्त्रियांसारखे अंडाशय आणि गर्भाशय असल्याची माहिती डॉक्टरांनी या तरुणाला दिली. तपासात हे समोर आले ती त्या तरुणाच्या शरिरारत अंडाशय आणि गर्भाशय असून, त्याला २० वर्षांपासून मासिक पाळी येत होती. म्हणजेच शारिरिक पातळीवर हा तरुण पुरुष नव्हताच तर स्त्री होता.
Shocking! Man finds out he has ovaries, uterus after 20 yrs
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/CTcss5Qk8n#Intersex #Viral #China #Menstruation pic.twitter.com/EOshdXKf0h
— ANI Digital (@ani_digital) July 10, 2022
20 वर्षांपासून येत होती मासिक पाळी, पुरुषाचे आणि स्त्रीचेही अवयव
या तरुणाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या शरिरात पुरुषांच्या जेनेटिक ऑर्गन्ससहित महिलांचे सेक्स क्रोमोसान, अंडाशय आणि गर्भाशयही होते, असे डॉक्टरांनी त्याला सांगितले. या तरुणाने लववीवेळी रक्त जात असल्याचे डॉक्टरांना सांगितले होते. ते रक्त नसून मासिक पाळी असल्याचे डॉक्टरांनी त्याला समजावले. हे सगळं गेल्या 20 वर्षांपासून सुरु होतं. या तरुणाला आपल्याला मासिक पाळी येत असल्याचे माहितच नव्हते.
तरुणाचे ऑपरेशन करुन फीमेल ऑर्गन्स काढून टाकले
हा तरुण जेव्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला होता, तेव्हा डॉक्टरांना सुरुवातीला त्याला अपेंडिसायटिस असेल असे वाटले होते. मात्र तपासणीत जे समोर आले त्याने डॉक्टरांनाही धक्का बसला. जेव्हा जेव्हा लघवीतून रक्त येते, त्याच्या आधी आणि नंतर काही दिवस पोटात दुखत असल्याचेही या तरुणाने डॉक्टरांना सांगितले. त्याची ही लक्षणे ऐकून त्याला मासिक पाळीमुळे हा त्रास होत असल्याचा संशय डॉक्टरांनाही आला नव्हता. मात्र हे सगळे सोमर आल्यानंतर, डॉक्टरांनी ऑपरेशन करुन त्याच्यातील फीमेल ऑर्गन्स काढून टाकले आहे. आता यापुढे हा तरुण पुरुषाप्रमाणे सामान्य जीवन जगू शकणार आहे. मात्र एक समस्या कायम राहणार आहे, ती म्हणजे या तरुणाला त्याच्या आयुष्यात मुले होऊ शकणार नाहीत. त्याच्याकडून टेस्टिकल्स स्पर्म्स तयार होऊ शकणार नाहीत, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.