धक्कादायक ! जनतेला संबोधित करत असताना स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर झाडल्या गोळ्या

कॅबिनेट मिटिंग आटोपून आल्यानंतर जनतेला संबोधित करत असतानाच पंतप्रधानांवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या आहेत. यानंतर पंतप्रधानांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ते चौथ्यांदा निवडणूक जिंकून पंतप्रधान झाले आहेत.

धक्कादायक ! जनतेला संबोधित करत असताना स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर झाडल्या गोळ्या
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 8:48 PM

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर जनतेला संबोधित करत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरारकडून त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रॉबर्ट फिकोची यांच्या प्रकृतीबाबत अजून कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांनाही गोळ्या घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्लेखोर किती जण होते याबाबत अजून कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सध्या एकाला ताब्यात घेतले आहे. पण तो हल्लेखोर आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही.

पंतप्रधानांना लागल्या दोन गोळ्या

स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांना दोन गोळ्या लागल्याची माहिती पुढे आली आहे. एक गोळी त्यांच्या छातीत तर दुसरी पोटात लागली आहे. पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे वय ७१ वर्ष असल्याची माहिती आहे. हा हल्ला का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण गोळ्या झाडल्यानंतर लगेचच पंतप्रधानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुरक्षा दलाकडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का याचा तपास सुरु आहे.

गेल्या वर्षी चौथ्यांदा झालेत पंतप्रधान

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौथ्यांदा निवडून आले होते. देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. युक्रेनला मिळणारी लष्करी मदत कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. रॉबर्ट यांनी चौथ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. रॉबर्ट हे पुतीन यांच्या जवळचे मानले जातात.

स्लोव्हाकिया हा पूर्व युरोपमधील एक देश आहे. हा देश सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. म्हणजेच हा असा देश आहे ज्याच्या सीमा समुद्राला मिळत नाहीत. या देशाचे क्षेत्रफळ अंदाजे 50 हजार चौरस किलोमीटर आहे. देशाच्या पूर्वेस युक्रेन आहे, पश्चिमेस झेक प्रजासत्ताक, उत्तरेस पोलंड आणि दक्षिणेस हंगेरी देश आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.