Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण कोरियात बाळ जन्माला घाला, लाखो कमवा

दक्षिण कोरिया सरकारने ज्या कुटुंबात बाळ जन्माला येईल त्या कुटुंबाला पैसे देण्याची योजना जाहीर केली आहे (South Korea government scheme for to increase birth rate).

दक्षिण कोरियात बाळ जन्माला घाला, लाखो कमवा
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 4:52 PM

सियोल (दक्षिण कोरिया) : भारतात वाढती लोकसंख्या ही गंभीर समस्या आहे. लोकसंख्या वाढीमुळे संसाधनांचा पुरवठा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे देशात गरिबी, बेरोजगारी सारख्या समस्या वाढतात. मात्र, दक्षिण कोरिया हा देश या विरुद्धच्या परिस्थितीशी झुंजत आहे. दक्षिण कोरियात गेल्या वर्षभरात जन्म दरापेक्षा मृत्यू दराची संख्या जास्त होती. त्यामुळे दक्षिण कोरिया सरकारने ज्या कुटुंबात बाळ जन्माला येईल त्या कुटुंबाला पैसे देण्याची योजना जाहीर केली आहे (South korea government scheme for to increase birth rate).

लोकसंख्या वाढावी यासाठी गेल्या महिन्यात कोरियाचे राष्ट्रपती मून जेई यांनी गेल्या आठवड्यात नव्या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत 2022 सालापासून जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला 20 लाख वॉर्न (दक्षिण कोरियाचे चलन) देण्यात येणार आहेत. याशिवाय सरकार बाळाच्या कुटुंबियांना वर्षभर 3 वॉर्न लाख रुपये प्रती महिने देणार असल्याची माहिती मून जेई यांनी दिली होती. त्याचबरोबर 2025 मध्ये हीच रक्कम 5 लाख वॉर्नपर्यंत केली जाणार आहे.

जन्म दरापेक्षा मृत्य दर अधिक

दक्षिण कोरिया हा जगात सर्वात कमी जन्म दर असलेला देश आहे. या देशात 2020 मध्ये 2,75,800 बाळांचा जन्म झाला. मात्र, हे प्रमाण 2019 च्या तुलनेने 10 टक्क्यांनी कमी झालं आहे. दुसरीकडे 2020 सालात दक्षिण कोरियात 3,07,764 लोकांचा मृत्यू झाला. जन्म दरात सतत होणारी घट ही दक्षिण कोरिया सरकारसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं ठारवलं आहे.

दक्षिण कोरियात जन्मदर कमी झाल्याने तरुणांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे देशात कामासाठी कामगार मिळणंदेखील कठीण होऊन बसलं आहे. दुसरीकडे वृद्ध नागरिकांना पेंशन सुरु असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडत आहे (South korea government scheme for to increase birth rate).

हेही वाचा : महिलेच्या जागेवर लढण्याचा तृतीयपंथीयाला अधिकार, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.