इतिहासात पहिल्यांदा….अवकाशात प्रायवेट स्पेसवॉक, आता मंगळावर जाण्याची तयारी
स्पेसएक्सने बनवलेल्या स्पेससूटची अवकाशात चाचणी हा या मिशनमागे उद्देश होता. हा सूट पारंपारिक स्पेस सूटपेक्षा वेगळा आहे. शरीरावर आपण कपडे घालतो तसा हा स्पेससूट आहे. अवकाशात वस्ती करण्याचा प्रयत्न करु त्यावेळी या स्पेससूटची गरज भासेल असं इसाकमॅन म्हणाले.
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने मोठं यश मिळवलय. स्पेसएक्सने पाठवलेल्या चार अंतराळवीरांच्या पथकाने गुरुवारी स्पेसवॉक केलं. हे जगातील पहिलं प्रायवेट स्पेसवॉक आहे. ‘पोलारिस डॉन’ या मिशनच नाव होतं. यात अंतराळवीरांनी कॅप्सूल खोललं व अवकाशात पाऊल ठेवलं. अवकाश मोहीमेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. या मिशनमध्ये 41 वर्षाचे अब्जाधीश जेरेड इसाकमॅन सर्वातआधी अवकाश यानातून बाहेर आले. ‘अवकाशातून पृथ्वी एक आदर्श जगासारखी दिसते’ असं जेरेड इसाकमॅन म्हणाले. यावेळी जेरेड इसाकमॅन यांचा मागचा भाग अंधारात आणि अर्धा हिस्सा प्रकाशाने भरलेला होता. त्यानंतर स्पेसएक्सची इंजिनियर सारा गिलिस बाहेर आली. दोघांनी मिळून 20 मिनिट अवकाशात स्पेसवॉक केलं.
स्पेसवॉकच्या तयारीसाठी दोन तास लागले. या दरम्यान सगळ्यांचे स्पेसशूट स्पेसशिपशी जोडलेले होते. स्पेसवॉकसाठी 30 मिनिटांची वेळ ठरवण्यात आली होती. यात त्यांनी स्पेसशूटची टेस्ट आणि तपासणी केली. स्पेसशूट बनवणं हे स्पेसएक्सच लक्ष्य आहे. पारंपारिक स्पेससूटच्या तुलनेत स्पेसशूट जास्त आरामदायक आणि सामान्य कपड्यांसारखा वाटला पाहिजे. या ऐतिहासिका यशाबद्दल NASA च्या प्रमुखांनी शुभेच्छा दिल्या. या पहिल्या व्यावसायिक स्पेसवॉकसाठी स्पेसएक्सच्या पूर्ण टीमला शुभेच्छा. हे यश नासा आणि अमेरिकी अवकाश अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच पाऊल आहे.
हा सूट पारंपारिक स्पेस सूटपेक्षा वेगळा
स्पेसएक्सने बनवलेल्या स्पेससूटची अवकाशात चाचणी हा या मिशनमागे उद्देश होता. हा सूट पारंपारिक स्पेस सूटपेक्षा वेगळा आहे. शरीरावर आपण कपडे घालतो तसा हा स्पेससूट आहे. अवकाशात वस्ती करण्याचा प्रयत्न करु त्यावेळी या स्पेससूटची गरज भासेल असं इसाकमॅन म्हणाले. जास्तीत जास्त स्पेससूट हवे यासाठी मस्कसोबत चर्चा झालीय. भविष्यात हजारोंच्या संख्येने कमी किंमतीत स्पेससूट उपलब्ध झाले पाहिजेत.
स्पेसएक्सने एक नव्या दिशेने पाऊल टाकलय
“स्पेसवॉक एक मोठ पाऊल आहे. लवकरच चंद्र आणि मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्याच्या दिशेने पावलं उचलली पाहिजेत” असं इसाकमॅन म्हणाले. स्पेसएक्सने एक नव्या दिशेने पाऊल टाकलय, ज्यामुळे भविष्यात अवकाश प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होऊ शकतो.