Pakistan | क्रूरकर्मा पाकिस्तान ! श्रीलंकन नागरिकाला जमावाकडून अमानुषपणे मारहाण, भर रस्त्यात जाळलं, जगभरातून संतापाची लाट
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. जमावाने जाळलेल्या श्रीलंकन नागरिकाचे नाव प्रियंता कुमारा असे असून पाकिस्तानवर जगभरातून टीका केली जात आहे.
इस्लामाबाद : मानवतेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पाकिस्तानध्ये घडली आहे. येथे मूळच्या श्रीलंकन नागरिकाला जमावाने अमानुषपणे मारहाण करत रस्त्यावरच जाळले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. जमावाने जाळलेल्या श्रीलंकन नागरिकाचे नाव प्रियंता कुमारा असे असून पाकिस्तानवर जगभरातून टीका केली जात आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील सियालकोट भागातील वझिराबाद रोडवर एका कंपनीमध्ये प्रियंता कुमारा यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते या कंपनीत एक्सपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. तहरिक-ए- लब्बैक या कट्टरतावादी संघटनेचे एक पोस्टर फाडून ते कचरा कुंडीत टाकल्याचा आरोप कुमारा यांच्यावर आलाय. या पोस्टरवर कुरानमधील पवित्र वचने लिहिलेली होती. कुमारा यांना हे पोस्टर फाडताना कारखान्यातील काही लोकांनी पाहिले होते. याच कारणामुळे त्यांना जमावाने भर रस्त्यात अमानुषपणे मारहाण केली. तसेच नंतर रस्त्यावरच त्यांचे प्रेत जाळले.
पाहा व्हिडीओ :
Warning Graphics⛔ Enraged Mob in Sialkot Kills Sri Lankan National,Burns His Body.Police have initiated a probe into the murder of victim Priyantha Diyawadana,who was the manager of a Rajco Industries factory.Punjab CM takes notice of the lynching,calls it a very tragic incident pic.twitter.com/gyz0Kz7IWE
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) December 3, 2021
घटनेचा तपास झाल्यानंतर माध्यमांना तपशील देणार
ही घटना घडल्यानंतर आता संपूर्ण जगभरातून टीका केली जात आहे. धार्मिक कट्टरतेतून ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पाकिस्तानमधील पंजाब येथील सरकार हादरले आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अतिशय दुखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सखोल तपास केल्यानंतर या घटनेचे तपशील माध्यमांना दिले जातील असे सियालकोटच्या पोलिसांनी सांगितले आहे.
उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री बुजदार यांनी या प्रकारणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या हत्याकांडाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांकडून त्यांनी तपासाचा अहवाल मागितला आहे. अशाच प्रकारची घटना सियालकोट येते 2010 मध्ये घडली होती. यावेली दोन सख्या भावांचा पोलिसांसमोरच खून करण्यात आला होता.
इतर बातम्या :