Sri Lanka Debt Crisis: खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी हाणामारी! 1 लीटर दुधाची किंमत तब्बल 2 हजार, सोन्याच्या लंकेवर एवढी वाईट परिस्थिती का?
Sri Lanka Debt Crisis: श्रीलंकेमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंची खूपच मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. खाद्यपदार्थांच्या कमतरतेमुळे वस्तूंच्या किंमती गगनाला पोहचलेल्या आहेत. देशातील लोकांना दूध देखील मिळणे कठीण झाले आहे.
श्रीलंका आत्तापर्यंत सर्वात मोठ्या खाद्यपदार्थांच्या संकटाला (Food crisis) तोंड देत आहे. देशामध्ये सर्व खाद्यपदार्थांची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे महागाईने सर्वोच्च दर गाठला आहे. अत्यल्प उत्पादन गट असणार्या व्यक्तींचे हाल तर होत आहेतच. पण त्याचबरोबर नोकरदार वर्गाची देखील परिस्थिती बिघडलेली आहे. अनेक लोक देश सोडत आहेत. श्रीलंकेमध्ये गेल्या 3 दिवसात दुधाची किंमत 250 श्रीलंकन रुपयाने वाढलेली आहे. देशातील नागरिकांना दुधासाठी तब्बल 2000 रुपये मोजावे लागत आहे.श्रीलंकेमध्ये (Sri lanka) दुधाची भयानक टंचाई निर्माण झालेली आहे. दुधाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.1 लिटर दुधासाठी सर्वसाधारणपणे लोकांना 2 हजार (1,975 श्रीलंकन रुपए) रुपये द्यावे लागत आहे. लोक 400 ग्रॅम दूध (milk rate hike) विकत घेण्यासाठी 790 रुपये देत आहेत.
दुधाचे दर वाढले..
दुधाच्या दरांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये 250 रुपयांची वाढ झालेली आहे,आतापर्यंत ही सर्वात जास्त दर वाढ ठरलेली आहे. इतकी महाग किंमत असून देखील लोकांना दुकानावर दूध मिळत नाही. अनेक दुकानातून दुधाचे पाकीट गायब होत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, श्रीलंकेमध्ये सोने एक वेळ सापडेल परंतु दुधासाठी लोकांना तासन्तास भटकावे लागत आहे. ज्या लोकांना दुधाची आवश्यकता आहे त्यांना सकाळी दुकानांसमोर रांगा लावून पायपीट करावी लागत आहे. हल्ली श्रीलंकेमध्ये दूध एक दुर्मिळ लक्झरी वस्तू बनलेली आहे.
तांदूळ आणि साखरेचा ही तुटवडा
श्रीलंकेमध्ये सरकारच्या नीति मुळे तांदूळ आणि साखर यांचा देखील तुटवडा भासत आहे. काही दिवसांपूर्वी देशातील गोटाबाया राजपक्षे सरकारने केमिलक फर्टिलाइजर्स वर पूर्णपणे बँन लावले आणि शंभर टक्के सेंद्रिय शेतीवर जोर दिला. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कृषी उत्पादन खूपच कमी झाले .तांदूळ आणि साखर यांची टंचाई निर्माण झाल्यामुळे अनेक वस्तूंचे दर गगनाला पोहचले आहेत
परीक्षा देखील रद्द..
श्रीलंकेमध्ये तांदूळ आणि साखर 290 रुपये प्रति किलो विकले जात आहे. असा अंदाज लावला जात आहे की, पुढील एका आठवड्यात तांदुळाचे दर प्रति किलो 500 रुपये होईल. लोक भविष्याबद्दल खूपच चिंता व्यक्त करताना दिसत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अनेक लोक अन्य वस्तू पदार्थांचे साठवणूक करत आहे. देशांमध्ये कागदाची कमतरता निर्माण झाल्यामुळे श्रीलंका सरकारने शाळेतील सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.
सेनेच्या हजेरीत इंधन तेल
आर्थिक संकटामुळे श्रीलंकेचे कंबरडे मोडले गेले आहे. पेट्रोलियम उत्पादनामध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये तुटवडा भासत आहे.पेट्रोल विकत घेण्यासाठी पेट्रोल पंपावर लोकांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहे. येथील परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. लांब रांगा मध्ये तासन्तास उभे राहिल्याने येथील तीन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू देखील झाला. ही घटना घडल्यानंतर पेट्रोल पंपावर सेना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. लोकांना सेनेच्या उपस्थितीत एक लिटर पेट्रोल दिले जात आहे.
का ओढवली बिकट परिस्थिती?
अशी परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेक कारणे जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. विदेशी मुद्रा भंडार कमी झाल्याचा सर्वात जास्त फटका या देशाला बसला आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्ये विदेशी मुद्रा भंडार 7.5 अब्ज डॉलर होते,गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये हे विदेशी मुद्रा कोष 1.58 अब्ज डॉलर इतके झाले.श्रीलंका वर चीन, जापान, भारत आणि अंतरराष्ट्रीय मुद्रा कोषचे भारी कर्ज झाले आहे परंतु विदेशी मुद्रा कोष कमी झाल्याने या देशाला कर्जावरील हप्ता देखील भरणे शक्य होत नाहीये.
श्रीलंका आपल्या अधिकतर खाद्य पदार्थ यांच्यासाठी, पेट्रोलियम उत्पादन , औषधें इत्यादी साठी अन्य देशांच्या आयात वर अवलंबून आहे परंतु विदेशी मुद्रा कोष अभावामुळे देश आयात करू शकत नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे देशाची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या देशांवर विजेचे संकट देखील वाढत आहे देशातील नागरिकांना 7 ते 8 तास अंधारामध्ये राहावे लागत आहे.
इतर बातम्या :
Gold Price Today : चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर
PayTM घसरण थांबेना! शेअर्स 520 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर, गुंतवणूकदारांना शॉक