‘अन्न, पाणी आणि औषधांचा साठा करा, रशिया-युक्रेन युद्धात हे देश उडी घेणार?

जो बायडेन यांनी युक्रेनला त्यांचा क्षेपणास्त्रांसह रशियावर हल्ला करण्याची परवानगी दिल्यानंतर तणाव आणखी वाढला. रशियाने आता यावर उघड धमकी दिली आहे. रशियाने आता युक्रेनवर पलटवार केला आहे. त्यामुळे आता इतर देश देखील या युद्धात उडी घेण्याची शक्यता आहे.

'अन्न, पाणी आणि औषधांचा साठा करा, रशिया-युक्रेन युद्धात हे देश उडी घेणार?
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 1:35 AM

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियावर त्यांच्य क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर मंगळवारी युक्रेनने रशियावर सहा क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे तणाव आणखी वाढला. या तणावाची झळ रशियाच्या सीमेजवळ असलेल्या तीन नाटो देशांमध्येही पोहोचली आहे. रशियाने केलेल्या पलटवाराने नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड या तीन नाटो देशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही देशांनी आपल्या नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचा साठा ठेवण्याची आणि आपल्या सैनिकांना युद्धासाठी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नाटोच्या संस्थापक देशांपैकी एक असलेल्या नॉर्वेची रशियाशी १९५ किमीची सीमा आहे. नॉर्वेने आपल्या नागरिकांना युद्धाबद्दल चेतावणी देणारी पत्रके आणि पॅम्प्लेट वितरित केले आहेत. स्वीडननेही आपल्या लोकांना पत्रके पाठवली आहेत. एवढेच नाही तर अणुयुद्धाच्या वेळी रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आयोडीनच्या गोळ्या घरात ठेवण्याच्या सूचनाही या देशांनी दिल्या आहेत.

नाटो सदस्य देश फिनलंडचीही 1340 किलोमीटरहून अधिक सीमा रशियाशी जोडलेली आहे. येथील सरकारने युद्ध परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी एक नवीन वेबसाइट सुरू केली आहे. फिनलंड सरकारने एक ऑनलाइन संदेश जारी केला आहे. देशावर हल्ला झाला तर सरकार काय करावा याबाबत यामध्ये सांगण्यात आलंय. फिनलंडने आपल्या लोकांना युद्धामुळे वीज कपातीचा सामना करण्यासाठी बॅक-अप वीज पुरवठा ठेवण्यास सांगितले आहे. लोकांना कमी ऊर्जा वापरणाऱ्या किंवा न शिजवता खाऊ शकणाऱ्या अन्नपदार्थांचा साठा ठेवण्यास सांगण्यात आले. फिनलंड 2023 मध्ये NATO मध्ये सामील झाला होता.

स्वीडन, नाटोचा सर्वात नवीन सदस्य देश आहे. तो रशियाशी सीमा सामायिक करत नाही. असे असूनही स्वीडनने ‘इन केस ऑफ क्रायसिस ऑफ वॉर’ नावाची पुस्तिका जारी केली आहे ज्यात युद्धाच्या बाबतीत नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. युद्धादरम्यान आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ७२ तासांचे अन्न, पिण्याचे पाणी आणि अत्यावश्यक औषधे साठवून ठेवावीत, असे त्यात म्हटले आहे. एवढेच नाही तर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लोकांना बटाटे, कोबी, गाजर आणि अंडी भरपूर प्रमाणात ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा तणाव समुद्रापर्यंत पोहोचला आहे. जर्मनी आणि फिनलंडवर बाल्टिक समुद्रातील दोन कम्युनिकेशन केबल्स कापल्याचा आरोप आहे. दोन्ही देशांनी सांगितले की, बाल्टिक समुद्रात कम्युनिकेशन केबल्स तुटण्याच्या या घटना १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी घडल्या होत्या, ज्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. बाल्टिक समुद्र हा एक महत्त्वाचा शिपिंग मार्ग आहे, ज्याच्या आसपास 9 देश आहेत. या घटनेमुळे संकरित युद्धाचा धोका वाढला आहे.

Non Stop LIVE Update
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.