काय घडतंय… सुनीता विल्यम्स ज्या स्टारलाइनरमध्ये फसलीय तिथून येतोय विचित्र आवाज… नासाही परेशान

सात दिवसांमध्ये परत येणारे दोन्ही अंतराळवीर स्टारलाइनमध्ये झालेल्या बिघाडामुळे 2025 पर्यंत तिथून अडकून पडले आहेत. यानंतर आता आणखी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टारलाइनमधून आता विचित्र आवाज येऊ लागला आहे. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळात असणारे सहकारी बुच विल्मोर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काय घडतंय... सुनीता विल्यम्स ज्या स्टारलाइनरमध्ये फसलीय तिथून येतोय विचित्र आवाज... नासाही परेशान
सुनीता विल्यम्स ज्या स्टारलाइनरमध्ये फसलीय तिथून येतोय विचित्र आवाज
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 9:37 PM

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स जून महिन्यापासून अंतराळात फसली आहे. सुनीता तिचा सहकारी बुच विल्मोर हिच्यासोबत सात दिवसांसाठी गेले होते. पण तिथे गेल्यानंतर मोठी अडचण निर्माण झाली. सुनीता विल्यम्स यांना अंतराळात घेऊन गेलेलं यान स्टारलाइनमध्ये बिघाड झाला. स्टारलाइनमध्ये हिलियम लिकेज आणि थ्रस्टरमध्ये खराबी झाल्याने दोन्ही अंतराळवीर अंतराळमध्ये अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे सात दिवसांमध्ये परत येणारे दोन्ही अंतराळवीर स्टारलाइनमध्ये झालेल्या बिघाडामुळे 2025 पर्यंत तिथून अडकून पडले आहेत. यानंतर आता आणखी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टारलाइनमधून आता विचित्र आवाज येऊ लागला आहे. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळात असणारे सहकारी बुच विल्मोर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मिशिगन येथील मीट्रियोलॉजिस्ट रॉब डेल याने बुच विल्मोर आणि मिशन कंट्रोल यांच्यातील संभाषण ‘एक्स’वर शेअर केलं आहे. दरम्यान, स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट बिघडल्यामुळे क्रू शिवाय पृथ्वीवर परत आणण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी ते पृथ्वीवर आणलं जाणार आहे. सध्या बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकावर थांबले आहेत.

अंतराळ स्थानकावर मुक्कामाला असणारे बुच विल्मोर यांनी ह्यूस्टन शहर येथील जॉनसन स्पेस सेंटरच्या मिशन कंट्रोस सोबत बातचित केली. यावेळी बुच विल्मोर यांनी स्टारलायनरमधून येत असलेल्या विचित्र आवाजाबद्दल सांगितलं. काहीतरी चालत आहे, अशा आवाज स्टारलायनरच्या स्पिकरमधून येत असल्याची माहिती बुच यांनी दिली. बुच विल्मोर यांनी स्पिकरच्या आवाज ऐकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिशन कंट्रोलला आवाज येत नव्हता. नंतर मिशन कंट्रोलला तो आवाज आला.

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.