‘गोऱ्या मुलींवर हे पाकिस्तानी…’ महिला मंत्र्याच्या वक्तव्याने शहबाज सरकार खवळलं
Suella Braverman Statement on Pakistan : "जाणूनबुजून डोळेझाक करणं. आपलं काम न करणं आणि गुन्ह्यावर मौन धारण करण यामुळे गुन्ह्याला प्रोत्साहन मिळतं" असं सुएला ब्रेव्हरमॅन म्हणाल्या.
Suella Braverman Statement on Pakistan : ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमॅन यांच्या एका वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. गोऱ्या इंग्रज मुलींवर पाकिस्तानी बलात्कार करतात, असं वक्तव्य सुएला ब्रेव्हरमॅन यांनी केलय. पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकारला सुएला ब्रेव्हरमॅन यांचं हे वक्तव्य अजिबात पटलेलं नाहीय. परिणाम भोगायला तयार रहा, इथपर्यंत धमकी दिलीय. ब्रिटनमध्ये पाकिस्तानी वंशाचे नागरिक गँगला प्रोत्साहन देत आहेत. प्रशासन त्यांच्याकडे डोळेझाक करतय, असा आरोप सुएला ब्रेव्हरमॅन यांनी केलाय.
पाकिस्तानने हे वक्तव्य फेटाळून लावलं
ब्रिटीश वंशाच्या पाकिस्तानी पुरुषांबद्दल ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमॅन यांनी केलेलं वक्तव्य भेदभावपूर्ण असल्याच पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानने हे वक्तव्य फेटाळून लावताना, असं काही होत नसल्याच म्हटलं आहे. सुएला ब्रेव्हरमॅन यांनी स्काय न्यूजला मुलाखत दिली. पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश पुरुषांच सांस्कृतिक दृष्टीकोनातून ब्रिटिश मुल्याला साजेस वर्तन नाहीय, असं ब्रेव्हरमॅन म्हणाल्या.
पाकिस्तानने काय म्हटलय?
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताच जेहरा बलोच यांनी पाकिस्तानकडून उत्तर दिलं. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी काही लोकांच गुन्हेगारी वर्तन चुकीच्या पद्धतीने सादर केलं व समुदायाला जबाबदार ठरवलं, असं पाकिस्तानने म्हटलय. ‘गुन्हेगारी पुरुषांचा एक समूह’
“गुन्हेगारी पुरुषांचा एक समूह आहे. यात जवळपास सर्वच ब्रिटिश पाकिस्तानी आहेत. ब्रिटिश मुल्यांपेक्षा त्यांचा वेगळा सांस्कृतिक दृष्टीकोन आहे. त्यांच वर्तन एक खुलं रहस्य आहे. मात्र, तरीही त्यांना त्यांचा समुदाय आणि समाजात आव्हान दिलं नाही. जाणूनबुजून डोळेझाक करणं. आपलं काम न करणं आणि गुन्ह्यावर मौन धारण करणं यामुळे गुन्ह्याला प्रोत्साहन मिळतं” असं सुएला ब्रेव्हरमॅन यांनी म्हटलय.