Sunita Williams : एक जोडी पँटमध्ये अंतराळात तीन महिने; सुनीता विल्यम्सची कशी आहे दिनचर्या?

सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे दोघेही अंतराळात जाऊन तीन महिने झाले आहेत. त्यांना पुढच्यावर्षीच पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपर्यंत त्यांना स्पेसमध्ये राहावे लागणार आहे. मधल्या काळात या दोघांनीही अंतराळात पत्रकार परिषद घेतली होती. पृथ्वीवरील जनतेशी संवाद साधला होता. तिथला अनुभव शेअर केला होता.

Sunita Williams : एक जोडी पँटमध्ये अंतराळात तीन महिने; सुनीता विल्यम्सची कशी आहे दिनचर्या?
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 8:10 AM

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आठ दिवसाच्या मिशनसाठी अंतराळात गेले होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे त्यांचा मुक्काम लांबला. तब्बल तीन महिन्यापासून हे दोघेही अंतराळात अडकून पडले आहेत. आता तर त्यांना आणखी आठ महिने अंतराळात अडकून राहावे लागणार आहे. केवळ एक जोडी पँटमध्येच सुनीताला अंतराळात काढावे लागले आहेत. अजून आठ महिने याच स्थितीत घालवावे लागणार आहेत.

सुनीताला फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर आणण्याचा नासाचा प्रयत्न आहे. अंतराळात सहा बेडरूमवाल्या घराच्या आकारात सुनीता ही इतर नऊ लोकांसोबत राहत आहे. सुनीता आणि विल्मोर यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी आपण अत्यंत चांगल्या परिस्थितीत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर वर राहणं किती सोपं आहे? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. त्यावर आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये राहणं सोपं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या ठिकाणी आम्हाला रोज दोन तास व्यायाम करावाच लागतो. नाही तर हाडं ठिसूळ होतील. या शिवाय स्वत:चे कपडे स्वत: धुवावे लागतात. आम्ही काय खातो त्याच्यावरही लक्ष द्यावं लागतं. अंतराळातील वास अत्यंत विचित्र आहे. तसेच व्यायाम करताना प्रचंड घाम येतो, असंही त्यांनी सांगितलं.

हलू सुद्धा शकत नाही

हे सुद्धा वाचा

घामाचे थेंब हवेत तरंगू नये म्हणून आम्ही हलू सुद्धा शकत नाही. आम्हाला एक जोडी पँटमध्ये तीन महिने राहावे लागले आहे, असंही त्यांनी सांगितलं. एका माजी अंतराळवीराने स्पेस सेंटरमध्ये जीवंत राहण्याचा खुलासा केला. आम्ही सकाळी 6.30 वाजता उठतो. आम्हाला हार्मनी नावाच्या आयएसएस मॉड्यूलमध्ये फोन बुथच्या आकाराच्या शयन कक्षात झोपावे लागते, असं त्यांनी स्पष्ट केलं. नासाचे अमेरिकन अंतराळवीर निकोल स्टॉट हे 2009 आणि 2011मध्ये दोन मिशननुसार अंतराळात 104 दिवस राहिले होते. जेव्हा अंतराळात कुटुंबाची आठवण येते तेव्हा तिथे आम्ही कुटुंबीयांचे फोटो आणि पुस्तकं पाहायचो, असं स्टॉट म्हणाले.

कोणताच ऋतू नसतो

काही भाग्यवंत अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर अंतराळात चालण्याची संधी मिळते. हेडफिल्ड यांच्या सांगण्यानुसार, त्यांना ही संधी दोनदा मिळाली होती. मी अंतराळात 15 तास घालवले आहेत. केवळ माझा प्लास्टिकचा चेहरा माझ्या आणि ब्रह्मांडाच्या दरम्यान उभा होता. हा काळही इतर आयुष्यातील 15 तासांसारखा होता. मात्र, स्पेस वॉक करताना अंतराळातील वास हा एखाद्या धातुचा वास असल्याची जाणीव झाली. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे वास आहेत. पण अंतराळात केवळ एकच वास आहे. पण आपल्याला नंतर लवकर त्याची सवय होते. या शिवाय अंतराळात कोणताही ऋतू नसतो. तुमच्या चेहऱ्यावर पाऊस पडत नाही आणि तुमचे केस हवेत उडत नाहीत, असंही हेडफिल्ड म्हणाले.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.