Sunita Willaims : काळजी वाढली… Blood Cells आणि DNAवर परिणाम होणार?; सुनीताला अंतराळात ‘या’ आजाराचा धोका

प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात आहेत. त्यांना आता पुढच्या वर्षीच भारतात आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तोपर्यंत सुनीता आणि तिच्या सहकाऱ्याला गंभीर आजाराला सामोरे जावं लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोठी चिंता वाढली आहे. काळजाचे ठोके चुकवणारी ही चिंता आहे.

Sunita Willaims : काळजी वाढली... Blood Cells आणि DNAवर परिणाम होणार?; सुनीताला अंतराळात 'या' आजाराचा धोका
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 7:48 PM

अंतराळातील वातावरण पृथ्वीवरील वातावरणापेक्षा अत्यंत वेगळं असतं. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर तब्बल दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या दोन्ही अंतराळांच्या शरीरावर तेथील वातावरणाचा हळूहळू परिणाम होत आहे. त्यांचं शरीर आजारी पडत आहे. एका रिपोर्ट्सनुसार या दोन्ही अंतराळवीरांना 2025मध्ये पृथ्वीवर आणलं जाऊ शकतं. त्यामुळे तब्बल वर्ष दीड वर्ष अंतराळात राहिल्याने या दोघांच्या शरीरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

1. अवकाशात तांबड्या पेशी नष्ट होतात

एक्सपर्टच्या माहितीनुसार, बराच काळ अंतराळात राहिल्याने रेड ब्लड सेल्स म्हणजे तांबड्या पेशी नष्ट होतात. त्याशिवाय डोळे, हार्ट सिस्टिम आणि बोन्स डेन्सिटीवरही त्याचा परिणाम होत असतो. अंतराळातील रेडिएशन मानवी शरीरातील तांबड्या पेशी नष्ट करते. त्यामुळे व्यक्तीला अंतराळात ॲनिमिया होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

2. म्यूटेशनमुळे जेनेटिक डिसऑर्डर होणार

अंतराळात रेडिएशनमुळे डीएनए हळूहळू डॅमेज होतो. डीएनए स्टँड तुटल्यामुळे म्यूटेशन होतो. म्यूटेशनमुळे व्यक्तीला जेनेटिक डिसऑर्डर होऊ शकतो. 1998 पासून 2001च्या दरम्यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सुमारे 1 ते 3 दिवसांचे स्पेस मिशन झाले होते. मिशन लॉन्च करण्यापूर्वी शास्त्रज्ञांनी अंतराळवीरांचे ब्लड सँपल घेतले होते. त्यानंतर लँडिंगच्या तीन दिवसानंतर ब्लडमध्ये फ्री-फ्लोटिंग मायटोकॉन्ड्रियल डीएनए वाढला होता.

3. सुनीताला स्पेस ॲनिमिया होऊ शकतो

आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला दोन मिलियन तांबड्या पेशी तयार होतात. तसेच त्या नष्टही होतात. एका अभ्यासानुसार, स्पेसमध्ये शरीर प्रति सेकंदाला तीन मिलियन सेल्स डॅमेज करतात. अंतराळात मानावाचे फ्लूड 10 टक्के नष्ट होते. त्यामुळेच सुनीताला स्पेस ॲनिमियासोबतच जेनेटिक डिसऑर्डर होण्याची शक्यता अधिक आहे.

कुटुंबीयांशी संवाद

अंतराळात असलेल्या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीसारखीच सुविधा मिळते. अंतराळवीरांकडे जेव्हा कधी अतिरिक्त वेळ असतो तेव्हा ते आपले मित्र आणि कुटुंबासोबत ईमेल, कॉलवर संपर्क साधून असतात. एवढेच नाही तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही ते करतात. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांच्या संपर्कात राहता येतं. स्टारलाइनर मिशनचे दोन्ही अंतराळवीर केवळ एक आठवड्यासाठी अंतराळात गेले होते. आता त्यांना पुढील वर्षापर्यंत तिथे राहावं लागेल अशी चिन्हे आहेत.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.