सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली, नवऱ्याची हैराण करणारी प्रतिक्रिया; थेट म्हणाला…
गेल्या दोन महिन्यासून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर अंतराळात अडकून पडले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अंतराळात राहावं लागत आहे. हे दोघे कधी पृथ्वीवर येतील याची काही शाश्वती नाहीये. त्यामुळे जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, सुनीता यांचे पती मायकल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
Sunita Williams : गेल्या दोन महिन्यापासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही अंतराळात अडकून पडले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये दोघे अडकलेले आहेत. त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांना कधी आणलं जाऊ शकतं हे काहीच सांगता येत नाहीये. नासालाही निश्चित असं काही सांगता येत नाहीये. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. या सर्व प्रकरणावर सुनीता विल्यम्सचा पती मायकल यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मात्र, या सर्व प्रकारावर मायकल हे चिंताग्रस्त नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सुनीता विल्यम्स अंतराळात अडकेलली आहे. पण त्यांचे पती मायकल विल्यम्स यांना त्याची चिंता नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंतराळ ही सुनीताची आनंदाची जागा आहे. तिथे तिला अनिश्चित काळासाठी राहावं लागलं तरी ती राहील, असं मायकल यांनी म्हटलंय. अंतराळात राहिल्यावर तिला आनंद मिळतो. तिथे ती आपल्या जबाबदाऱ्यांचा आनंद घेत आहे, असंही मायकल यांनी म्हटलं आहे.
विल्मोरची बायको काय म्हणाली?
विल्मोर यांच्या कुटुंबानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विल्मोर यांची पत्नी डियाना यांनी न्यूयॉर्क पोस्टला प्रतिक्रिया दिली होती. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत किंवा मार्चपर्यंत ते दोघेही परत येतील अशी आम्हाला आशा आहे, असं डियाना म्हणाली.
दोन महिन्यापासून अंतराळात
बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे 5 जून रोजी अंतराळात गेले होते. बोइंगच्या नव्या स्टारलाइनर कॅप्सुलच्या माध्यमातून ते अंतराळात गेले होते. सुरुवातीला हे मिशन केवळ आठ दिवसाचं होतं. पण हिलियम लिक्स आणि थ्रस्टर फेल्युअर झाले. या तांत्रिक कारणामुळे त्यांना आता अंतराळातच अडकून पडावे लागले आहे. अनिश्चितकाळासाठी ते अंतराळात राहण्याची शक्यता आहे.
नासाची नवी माहिती काय?
नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता आणि विल्मोर यांनी फेब्रुवारीपर्यंत अंतराळात राहावं लागू शकतं. सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये ते सात अंतराळवीरांसोबत राहत आहेत. अंतराळात हे सर्व जण स्पेसक्राफ्टचे मेंटेनन्स आणि विद्यार्थ्यांशी लाइव्ह संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. नासाच्या कमर्शिअल क्रू प्रोग्रामचे संचालक स्टिव्ह स्टिच यांनी या दोन्ही अंतराळवीरांना जुलैच्या अखेरपर्यंत पृथ्वीवर आणलं जाईल असं सांगितलं होतं. पण आता वर्षाच्या अखेरपर्यंत या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर आणलं जाऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.