पंतप्रधानपदासाठी दुसऱ्या कुणालाही पाठिंबा द्या, मात्र ऋषी सुनक यांना नको, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा सुनक यांच्यावर राग
लंडन- माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (former PM Boris Johnson)यांनी ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्याविरोधात गुप्त अभियान सुरु केले आहे. या मोहिमेला बॅक एनीवन बट ऋषी (Back anyone but Rishi)असे नाव देण्यात आल्याची माहिती आहे. सुनक यांच्यामुळे बोरिस जॉन्सन यांचे पद गेले असे सांगण्यात येते. जॉन्सन यांनी सार्वजनिकरित्या कुठल्याही पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील नावाला पाठिंबा दर्शवला नसला, तरी […]
लंडन- माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (former PM Boris Johnson)यांनी ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्याविरोधात गुप्त अभियान सुरु केले आहे. या मोहिमेला बॅक एनीवन बट ऋषी (Back anyone but Rishi)असे नाव देण्यात आल्याची माहिती आहे. सुनक यांच्यामुळे बोरिस जॉन्सन यांचे पद गेले असे सांगण्यात येते. जॉन्सन यांनी सार्वजनिकरित्या कुठल्याही पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील नावाला पाठिंबा दर्शवला नसला, तरी पेनी मॉरडन्ट आणि लिज ट्रस यांच्या नावांना जॉन्सन यांचा विरोध नसल्याचे सांगण्यात येते आहे.
जॉन्सन यांनी का दिला पीएमपदाचा राजीनामा
३० जून रोजी डेप्युटी चिफ व्हीपच्या पोस्टवर क्रिस पिंचर यांची वर्णी लावणे, हे बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याचे प्रमुख कारण मानण्यात येते. पिंचर हे सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले होते. हे माहित असूनही जॉन्सन यांनी त्यांची नियुक्ती केली. यासह लॉकडाऊनच्या काळात दारुची पार्टी करणे आणि प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी पार्टी केल्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. प्रिन्सच्या प्रकरणात तर त्यांना माफी मागावी लागली होती.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋशी सुनक यांचे नाव नक्की
या सगळ्या काळात, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कंझरव्हेटिव्ह पार्टीच्या खासदारांच्या समर्थनानंतर, टॉप २ च्या स्पर्धकांत ऋषी सुनक यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शुक्रवारी सुनक यांच्यासह टॉम डुजेंट, पेनी मॉरल्ड, केमी बडेनोट आणि लिज ट्रस यांच्यात टीव्हीवर डिबेट झाले. यातही सुनक यांनी भक्कम बाजू मांडली. आता कंझरव्हेटिव्ह पार्टीच्या २ लाख मतदारांचे मन जिंकण्याचे पुढचे आव्हान ऋषी सुनक यांच्यासमोर आहे.
रेडी फॉर ऋषी असे सुरु आहे कॅम्पेन
कंझरव्हेटिव्ह पार्टीच्या मतदारांमध्ये ४४ टक्के सदस्य हे ६६ वर्षांपेक्षा अदिक वयाचे आहेत. तसेच यातील ९७ टक्के हे वर्णाने गोरे आहेत. सध्या ऋषी सुनक यांना पेनी मॉरडन्ट यांचे आव्हान आहे. पेनी याही गोऱ्या आहेत. मूळ भारतीय असलेल्या सुनक यांना पंतप्रधानपद मिळवण्यासाठी गौरवर्णियांची मते आणि मने वळवावी लागणार आहेत. त्यामुळे सुनक आपल्या रेडी फॉर ऋषी या कॅम्पेनच्याद्वारे गौरवर्णियांचे प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यामुळे त्यांची मने जिंकता येतील अशी अपेक्षा ऋषी यांना आहे.
विरोधक पेनी यांना कंझरव्हेटिव्ह पार्टीत मोठा पाठिंबा
सध्याच्या स्थितीत ६७ टक्के मतांसह पेनी मॉरडन्ट या ऋषी सुनक यांच्यापेक्षा पुढे आहेत. सुनक यांच्याकडे केवळ २८ टक्क्यांचे समर्थन आहे.