Sweden च्या पहिल्या महिला पंतप्रधानांचा नियुक्ती झाल्यानंतर काही तासांतच राजीनामा! काय झाला राजकीय खेळ?

मॅग्डालेना अँडरसन (Magdalena Andersson) यांना बुधवारी पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले होते, मात्र त्या सहयोगी पक्षाच्या राजकीय खेळीला बळी पडल्या. त्यांनी युती केलेला पक्ष सरकारमधून बाहेर पडला आणि अँडरसनचे बजेट पास होऊ शकले नाही. त्यांना नंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Sweden च्या पहिल्या महिला पंतप्रधानांचा नियुक्ती झाल्यानंतर काही तासांतच राजीनामा! काय झाला राजकीय खेळ?
Anderson recieving standing ovation for becoming first female PM in Sweden (Reuters photo)
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 9:27 AM

स्वीडन (Sweden) देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानांनी नियुक्ती झाल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिल्याती आश्चर्यकारक घटना घडली आहे. मॅग्डालेना अँडरसन (Magdalena Andersson) यांना बुधवारी पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले होते, मात्र त्या सहयोगी पक्षाच्या राजकीय खेळीला बळी पडल्या. त्यांनी युती केलेला पक्ष सरकारमधून बाहेर पडला आणि अँडरसनचे बजेट पास होऊ शकले नाही. त्यांना नंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. संसदेने विरोधकांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पासाठी मतदान केले. “मी स्पीकरला सांगितले आहे की मला राजीनामा द्यायचा आहे, अँडरसन यांनी मिडीयाला सांगितले. अँडरसन म्हणाल्या की, सरकार स्थापन करुन पुन्हा पंतप्रधान होण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत.

काय घडलं नेमकं?

मॅग्डालेना अँडरसने युती केलेल्या, ग्रीन्स पार्टीने (Green Party) सांगितले की राइट विंग पार्टीसोबत प्रथमच अर्थसंकल्प तयार केला गेला होता, जो त्यांच्यासाठी अस्वीकार्य होते. अँडरसनची बुधवारी पंतप्रधान म्हणून निवड झाली होती कारण स्वीडिश कायद्यानुसार, त्यांना फक्त विरोधात मतदान न करणाऱ्या बहुसंख्य खासदारांची आवश्यकता होती. त्या सोशल डेमोक्रॅट पक्षाच्या (Social Democratic Party) नेत्या आहेत.

स्वीडनमध्ये तब्बल 100 वर्षांनंतर एका महिला नेत्याला संसदेत मतं मिळाली होती. 54 वर्षीय सोशल डेमोक्रॅट नेत्या मॅग्डालेना अँडरसन यांना संसदेने स्टैंडिंग ओवेशनही दिले होते. मात्र, त्यांच पंतप्रधान पद काही तासांताठीच राहीलं. अल्पसंख्याक सरकारच्या प्रमुखपदी त्यांची निवड शेवटच्या क्षणी विरोधी पक्षाशासोबत स्वीडिश लोकांसाठी उच्च निवृत्ती वेतनाबाबत करारानंतर झाली होती. ज्यानंतर अँडरसनला ग्रीन्स पार्टीने पाठींबा दिला होता.

कोण आहेत मॅग्डालेना अँडरस?

54 वर्षीय मॅग्डालेना अँडरस सोशल डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या आहेत. अँडरसन ह्या उप्पसाला विद्यापीठाच्या माजी ज्युनियर स्विमिंग चॅम्पियनही आहेत. त्यांनी 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधान गोरान पर्सनच्या राजकीय सल्लागार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी गेली सात वर्ष स्वीडनच्या अर्थमंत्री म्हणून काम केले आहे.

इतर बातम्या

आज पंतप्रधान मोदी करणार नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन; ‘असे’ असेल आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ

International Flights: अखेर दोन वर्षांनंतर भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सामान्य होणार

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.