तालिबान भारताला अधिक महत्त्व देऊ लागल्याने पाकिस्तानमध्ये जळफळाट

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तालिबान सत्तेत येण्याआधी पासून चांगले आहेत. तालिबान सत्तेत आल्याने भारताने चिंता व्यक्त केली होती. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानच राज्य करत असल्याने आता त्याला भारतासोबत संबंध वाढवायचे आहेत.

तालिबान भारताला अधिक महत्त्व देऊ लागल्याने पाकिस्तानमध्ये जळफळाट
afganistan
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 8:30 PM

तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केलं तेव्हा भारताने देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्प राबवले आहेत त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध चांगले आहेत. जेव्हा तालिबान सत्तेत आलं तेव्हा पाकिस्तान खूप आनंदी होता. तालिबान आल्याने त्याचे भारतासोबत संबंध बिघडतील असे पाकिस्तानला वाटले होते. पण घडले उलटे. तालिबानचे पाकिस्तानसोबतचे संबंध सातत्याने बिघडत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या चलनावरच बंदी घातली. आता भारताच्या मदतीने तालिबान आपला व्यापार वाढवत आहे.

भारताने बांधलेल्या बंदरातून व्यापार

अफगाणिस्तान आता पाकिस्तानमधून व्यापार करण्याऐवजी भारताने बांधलेल्या इराणच्या चाबहार बंदरातून व्यापार करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध बिघडत असताना पाकिस्तानी जनतेने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी पाकिस्तानी लोकं पाकिस्तानलाच दोष देत आहेत.

पाकिस्तानी यूट्यूबर सुहैब चौधरी याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांबाबत पाकिस्तानी लोकांशी चर्चा केली. सुहैबशी बोलताना पाकिस्तानचे वकील एम.ए.खान म्हणाले की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध मजबूत आहेत. अफगाणिस्तानातील लोक आम्हाला आवडत नाहीत. सीमेवर अजूनही आपल्यामध्ये धोका आहे. अफगाणिस्तानातून सातत्याने हल्ले होत आहेत. एवढेच नाही तर तालिबान आता भारताला तिथे जागा देत आहे. अफगाणिस्तानला व्यापारात पाकिस्तानचा फायदा होत नाही, त्यामुळे त्यांना भारताशी संबंध वाढवायचे आहेत, असे खान म्हणाले.

अफगाणिस्तान पाकिस्तानवर का नाराज

दुस-या एका व्यक्तीने सांगितले की, संबंध बिघडण्यामागे पाकिस्तानची धोरणे जबाबदार आहेत. इस्लामाबाद अमेरिकेला खूश करत असल्याने अफगाणिस्तान संतप्त आहे. पेट्रोल कुणाकडून घ्यायचे आणि गॅस कुणाकडून घ्यायचे ते अमेरिका सांगते. बांगलादेशला स्वातंत्र्य आपल्यापेक्षा उशिरा मिळाले आणि तो आपल्या पुढे आहे. अफगाणिस्तान आपल्याशी अशी वागणूक देत आहे जसा कोणताही मुस्लीम दुसऱ्या मुस्लिमाशी करत नाही. अफगाणिस्तानचे लोक हिंदूंशी (भारत) हातमिळवणी करून आमच्याशी वैर करत आहेत.

आणखी एका व्यक्तीने सांगितले की, 1947 पासून पाकिस्तानात आलेल्या सर्व राज्यकर्त्यांपैकी कोणीही देशाचा विचार केला नाही. आमच्या एजन्सी अफगाणिस्तानात हस्तक्षेप करतात, त्यामुळेच अफगाणिस्तानचे लोक आमच्यावर नाराज आहेत. अफगाणिस्तानच्या जनतेच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या भारत पूर्ण करत आहे. भारत अफगाणिस्तानात धरण बांधत आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी मदत करत आहे. यामुळेच अफगाणिस्तान भारताशी संबंध पाकिस्तानच्या वर ठेवत आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.