तुमची उंची किती यावर समस्या अवलंबून, अमेरिका आणि ब्रिटन नागरिकांना जास्त जोखीम, भारतीयांना टेन्शन! वाचा सविस्तर…
सध्या उंचीशी संबंधित एक संशोधन समोर आहे. जास्त उंची ही आपल्यासाठी धोकादायक असू शकते. तुमची उंची 5 फूट 9 इंचांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 100 पेक्षा जास्त आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
मुंबई : उंच अंगकाठी नेहमी चांगली मानली जाते. मात्र अमेरिकेत करण्यात आलेल्या एका मोठ्या अनुवांशिक संशोधनात हे समोर आले आहे की, जास्त उंची (Tall People) ही आपल्यासाठी धोकादायक असू शकते. तुमची उंची 5 फूट 9 इंचांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 100 पेक्षा जास्त आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. पण दिलासादायक बाब ही की बहुतेक भारतीय (Indian) यात येत नाहीत.
संशोधन काय सांगतं?
सध्या उंचीशी संबंधित एक संशोधन समोर आहे. जास्त उंची ही आपल्यासाठी धोकादायक असू शकते. तुमची उंची 5 फूट 9 इंचांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 100 पेक्षा जास्त आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अमेरिकेत हे संशोधन 2.8 लाखांहून अधिक प्रौढांवर करण्यात आलं. यामध्ये गोरे-काळे, हिस्पॅनिक अश्या सर्वच स्तरातील स्त्री-पुरुषांवर हे संशोधन करण्यात आलं.
उंची जास्त असल्याने कोणता धोका संभावतो?
जास्त उंची असल्याने काही धोके संभावतात. याविषयीच्या संशोधनानंतर काही बाबीसमोर आल्या आहेत. “उंच असण्याने हृदयाच्या लय अनियमितता, वैरिकास नसणे, मज्जातंतूंचे नुकसान आणि पायात अल्सर होण्याचा धोका वाढतो”, असं रॉकी माउंटन रिजनल मेडिकल सेंटरचे प्रमुख संशोधक डॉ. श्रीधरन राघवन यांनी सांगितलं.
उंच लोकांना त्रास संभवतो…
जास्त उंची असणाऱ्या लोकांना काही त्रास होण्याची शक्यता असते. त्वचा आणि हाडांच्या संसर्ग होण्याची शक्यता असते. यासोबतच त्यांना नखांमध्ये रक्त गोठण्याचा आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचाही धोका असतो. हृदयातून पायांपर्यंत रक्त पोहोचण्यासाठी जास्त अंतर पार करावं लागतं. त्यामुळे त्याचा प्रवाहीपणा कमी होऊ लागतो. हाडे, स्नायू आणि पायांवर जास्त दबाव येतो. उंच लोकांना हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या मोठ्या आजारांचा धोका कमी असतो.