आपल्या लेखणीने जग हादरवणाऱ्या लेखिकेची जीव देण्याची धमकी, सतावत आहे ही मोठी चिंता, बांगलादेशमधील ताज्या घडामोडींशी कनेक्शन काय?

Taslima Nasreen : कधीकाळी आपल्या लेखणीने जगातील तालिबानी विचारांना हादरवून सोडणाऱ्या तस्लीमा नसरीन यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. बांगलादेशातील ताज्या घडामोडीनंतर त्यांनी भारताकडे मोठी मागणी केली आहे. नाहीतर जीव देण्याची धमकी दिली आहे.

आपल्या लेखणीने जग हादरवणाऱ्या लेखिकेची जीव देण्याची धमकी, सतावत आहे ही मोठी चिंता, बांगलादेशमधील ताज्या घडामोडींशी कनेक्शन काय?
का वाटते भीती?
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 10:45 AM

शेजारील देश बांगलादेशातील निर्वासित लेखिका तस्लीमा नसरीन यांनी मोठी भारताची चिंता वाढवली आहे. कधीकाळी आपल्या बंडखोर लेखणीने त्यांनी तालिबानी विचारसरणीला हादरवून सोडले होते. त्या सध्या भारतात वास्तव्याबाबत चिंतेत आहे. आपली राहण्याची कायमस्वरुपी व्यवस्था न झाल्यास आपण मरुन जाऊ असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं आहे. तस्लीमा या 2011 पासून भारतात आश्रयाला आहेत. त्यांचा देशात राहण्याचा परवाना (Permit) 27 जुलै रोजी संपले आहे. केंद्र सरकारने अद्याप त्याचे नुतनीकरण केले नाही. भारतात राहणे आवडते. पण गेल्या दीड महिन्यांपासून केंद्र सरकारने आपल्या वास्तव्याचा परवाना नूतन केलेला नाही, असे त्या म्हणाल्या.

भारत सरकारकडून नाही प्रतिसाद

आपण अनेक मुद्यांवर केंद्र सरकारशी संवाद साधला. पण केंद्र सरकारने प्रतिसाद दिला नसल्याचा दावा त्यांनी केला. “मला माहिती नाही कुणासोबत चर्चा करायची. गृह मंत्रालयात कोण या मुद्यांवर माझ्याशी चर्चा करेल. मी प्रयत्न केला. पण कोणाशीच चर्चा होत नाही. मी ऑनलाईन माझं स्टेट्‍स तपासत आहे. पण अजून त्यावर कोणतेच पुष्टीकरण मिळालेले नाही. यापूर्वी असं कधीच झालं नाही. इतका वेळ लागला नाही.” त्या असे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

बांगलादेशातून निर्वासीत झाल्यावर तस्लीमा दीर्घकाळ युरोपमध्ये थांबल्या. त्यानंतर त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांना लागलीच परवाना मिळत होता. त्या 2011 पासून सातत्याने दिल्लीमध्ये राहत आहेत.

बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा परिणाम?

बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी सध्याचे सरकार उलथून लावले. शेख हसीना यांना पदच्युत केले. सध्या तिथली परिस्थिती पाहता केंद्र सरकार सावधगिरीने पाऊल टाकत आहे. भारताच्या शेजारील देशात मोठी उलथापालथ सुरू आहे. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान आणि आता बांगलादेशात सुद्धा राजकीय आणि सामाजिक अस्थिरता आहे. त्यामुळे या परिस्थितीचा परिणाम नसरीन यांच्या वास्तव्य परवान्यावर दिसून येत तर नाही ना? अशी चर्चा होत आहे.

नाहीतर मी मरूनच जाईन

“बांगलादेश आणि तिथल्या राजकारणाशी आपले काहीच देणे घेणे नाही. मी तर कित्येक वर्षांपासून भारतात राहत आहे. मी भारतात स्वीडीश नागरीक म्हणून राहत आहे. बांगलादेशातील सध्याच्या वादापूर्वीच माझे परमीट रद्द झाले आहे. 2017 मध्ये तांत्रिक कारणामुळे उशीर झाला होता. पण आता मोठा कालावधी उलटला आहे. लोकांना वाटते माझी सरकार, बड्या नेत्यांशी ओळख आहे. पण तसे नाही. मला आता परमीट मिळाले नाही तर मी मरूनच जाईन. आता माझी कुठेच जाण्याची इच्छा नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.