चीनमध्ये 1,000 वर्षांनंतर भयंकर पाऊस; 33 मृत्युमुखी, रुग्णालयात शिरले पाणी

प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभाग म्हणाले की, मुसळधार पावसामुळे हेनान प्रांतात सुमारे 30 लाख लोकांना त्रास झाला आणि एकूण 3,76,000 स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

चीनमध्ये 1,000 वर्षांनंतर भयंकर पाऊस; 33 मृत्युमुखी, रुग्णालयात शिरले पाणी
चीनमधला पूर
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 6:27 AM

बीजिंग : चीनच्या 1,000 वर्षानंतर झालेल्या मुसळधार पावसात मृतांचा आकडा 33 वर पोहोचला असून, आठ लोक बेपत्ता आहेत. पूरग्रस्त झेंगझोऊ शहरातील अधिकारी पुराच्या पाण्यामुळे रुग्णालयात अडकलेल्या रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभाग म्हणाले की, मुसळधार पावसामुळे हेनान प्रांतात सुमारे 30 लाख लोकांना त्रास झाला आणि एकूण 3,76,000 स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

पुराच्या पाण्यातूनच रुग्णालयांतून रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्न

चीन सरकारच्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार, पुराच्या पाण्यातूनच रुग्णालयांतून रुग्णांना बाहेर काढण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवला. हेनानमधील अनेक रुग्णालये पुरामुळे बाधित झालीत आणि रुग्ण, त्यांचे कुटुंब आणि वैद्यकीय कामगार आत अडकलेत. फुवई रुग्णालयात पुराचे पाणी शिरले. गुरुवारी सकाळी बचाव कामगारांनी रुग्णांना, त्यांचे कुटुंबे आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना इतर ठिकाणी हलवायला सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे पाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

1,075 रुग्ण ज्यांपैकी 69 जणांची प्रकृती गंभीर

रुग्णालयाचे उपाध्यक्ष गाओ चुआन्यू यांनी शिन्हुआला सांगितले की, “1,075 रुग्ण ज्यांपैकी 69 जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.” नातेवाईकांची संख्या सुमारे 1,300 च्या घरात आहे. शिन्हुआच्या अहवालानुसार, मुसळधार पावसामुळे 2,15,200 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले. यामुळे सुमारे 1.22 अब्ज युआन (सुमारे 18.86 कोटी अमेरिकन डॉलर्स) चे थेट आर्थिक नुकसान झाले. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचा पाऊस क्वचितच पाहिला गेलाय. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत झेन्झझो येथे 1.26 कोटी लोकसंख्या असलेल्या सार्वजनिक ठिकाणी व ‘सबवे बोगद्यात’ पाणी शिरलंय. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असताना एक धरण उडवून टाकलेय, जेणेकरून पाण्याचा प्रवाह दुसऱ्या ठिकाणी वळविला जाईल.

भुयारी मार्गामुळे सबवे स्थानकांवर पुराचे पाणी आल्याने 12 लोकांचा मृत्यू

भुयारी मार्गामुळे सबवे स्थानकांवर पुराचे पाणी आल्याने 12 लोकांचा मृत्यू आणि पाच जण जखमी झालेत. मंगळवारी रात्री वेगाने वाढत असलेल्या पुराचे पाणी भुयारी मार्गाने रेल्वे ट्रॅकमध्ये घुसले, यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाला. भिंत कोसळल्याने अन्य दोघांचा मृत्यू झाला. अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये बचाव कामगार सबवे बोगद्यात अडकलेल्या लोकांची सुटका करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कार आणि इतर वाहने पाण्यात तरंगताना दिसतायत, तर इतर अनेक व्हिडीओंमध्ये लोक रस्त्यावरून वाहत जाताना दिसत आहेत.

पीएलएला सैन्य तैनात करण्याचे आदेश

पुराची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीएलएला सैन्य तैनात करण्याचे आदेश दिलेत. ते म्हणाले की, सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. झिन्हुआने शी यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, पावसाने पूर नियंत्रण परिस्थिती चिघळविली असून, झेंगझो व इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेय. अनेक नद्यांचे पाणी धोकादायक पातळीवर पोहोचले. झेंगझोऊडोंग रेल्वे स्टेशनवर 160 हून अधिक प्रवासी गाड्या थांबविण्यात आल्या. झेंगझोऊ विमानतळावर 260 उड्डाणे रद्द करण्यात आली.

संबंधित बातम्या

Flood Photos : चिपळूण ते चीन, पुराचा हाहा:कार, गाड्याच गाड्या सगळीकडे, हजार वर्षात पहिल्यांदा घडतंय?

दानिश सिद्दीकींना कसं मारलं तालिबाननं? डोकं सुन्न करणारा घटनाक्रम, भारतीयांचा किती तिरस्कार करणार?

Terrible rains in China after 1,000 years; 33 deaths, water seeped into hospital

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.