Sydney Terror Attack : मोठी बातमी, ऑस्ट्रेलियात मॉलवर भीषण दहशतवादी हल्ला, नेमकं काय घडलंय?
Sydney Terror Attack : ऑस्ट्रेलियात सिडनी येथे एका मॉलवर भीषण दहशतवादी हल्ला झाल्याच वृत्त आहे. सध्या इथे गोंधळाची स्थिती आहे. नेमकं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीय. लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकल्याच स्थानिक लोकांच म्हणणं आहे. त्यानंतर लोकांना तिथून पळताना पाहिलं.
ऑस्ट्रेलियात सिडनी येथे एका मॉलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिडनी येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार झाला असून चाकूने सुद्धा हल्ला करण्यात आला. यात काही जणांचा मृत्यू झाला आहे. सिडनी पोलिसांच्या मते हा दहशतवादी हल्ला आहे. हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लोक आपले प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हजारो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
न्यू साऊथ वेल्स राज्याच्या पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव टाकलाय. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात जमाव मॉल बाहेर पळताना दिसतोय. पोलिसांच्या गाड्या आणि इमर्जन्सी सेवा त्या क्षेत्रामध्ये दिसतायत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते. त्यात एकाला मारण्यात आलय. दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
स्थानिकांकडून महत्त्वाची माहिती
रिपोर्टनुसार, बोंडी जंक्शनवर हा हल्ला झालाय. दुकानदारांना लक्ष्य करण्याचा हल्लेखोरांचा उद्देश होता, असं सिडनी पोलिसांच मत आहे. मॉल कॅम्पसमध्ये इमरर्जन्सी सेवा बहाल करण्यात आल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकल्याच स्थानिक लोकांच म्हणणं आहे. त्यानंतर लोकांना तिथून पळताना पाहिलं.
खच्चून भरलेलं शॉपिंग सेंटर
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितलं की, हल्ला विशाल वेस्टफील्ड बॉन्डी जंक्शन मॉल परिसरात झाला. शनिवारी दुपारी खरेदीसाठी हा मॉल खच्चून भरलेला होता. सध्या मॉल बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी लोकांना या क्षेत्रापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. पोलीस या घटनेसंबंधी चौकशी करत आहेत. हल्लेखोर कुठून आले? त्यांची मागणी काय होती? याचा पोलीस शोध घेत आहेत.