Pakistan Election | भारताचा नंबर 1 शत्रू हाफिज सईदच्या मुलाचं पाकिस्तानच्या निवडणुकीत काय झालं?

Pakistan Election | पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक झाली. तिथे लवकरच नवीन सरकार येणार आहे. 12 तास विलंबाने आता हळूहळू निकाल जाहीर होत आहेत. 8 फेब्रुवारीला पाकिस्तानात प्रांताच्या सुद्धा निवडणूका झाल्या. हाफिज सईदचा मुलगा सुद्धा निवडणूक लढवत होता, त्याचा काय निकाल लागला?

Pakistan Election | भारताचा नंबर 1 शत्रू हाफिज सईदच्या मुलाचं पाकिस्तानच्या निवडणुकीत काय झालं?
hafiz saeed
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 12:56 PM

Pakistan Election | पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक झाली. त्याचे निकाल जाहीर होत आहेत. इम्रान खान यांच्या पीटीआयच समर्थन असलेले स्वतंत्र उमेदवार आणि नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनमध्ये अटी-तटीचा सामना सुरु आहे. या निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा सुद्धा उतरला होता. सईदच्या मरकजी मुस्लिम लीगने अनेक जागांवर उमेदवार उभे केले होते. हाफिज सईद हा भारताचा नंबर 1 शत्रू आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य मास्टरमाइंड आहे.

हाफिज सईदच्या पक्षाने ज्या जागा लढवल्या, त्यातील एक जागेवर त्याचा मुलगा तल्हा सईद उमेदवार होता. मिळालेल्या माहितीनुसार, तल्हा सईदचा या निवडणुकीत दारुण पराभव झालाय. तल्हा सईद लाहोरच्या एनए-122 मतदारसंघातून उमेदवार होता. पण पाकिस्तानी जनतेने दहशतवादाला नाकारलं.

तल्हा सईदला किती मत मिळाली?

तल्हा या निवडणुकीत सहाव्या स्थानावर राहिला. त्याला फक्त 2042 मत मिळाली. लतीफ खोसा या नेत्याने तल्हा सईदला हरवलं. लतीफ खोसा माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्तीय समजला जातो. लतीफ खोसाने 1 लाखापेक्षा जास्त मत मिळवून ही जागा जिंकली.

तल्हा सईद भारताचाही दुश्मन

तल्हा सईद लश्कर-ए-तैयबामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. हाफिज सईदनंतर त्याच दहशतीच साम्राज्य तल्हा सईदकडे आहे. भारत सरकारने UAPA अंतर्गत तल्हा सईदला दहशतवादी घोषित केलय. केंद्रीय गृह मंत्रालयानुसार भारतात लश्कर-ए-तैयबाने जे दहशतवादी हल्ले केले, त्यामागे तल्हा सईदचा हात होता.

अनेकदा हल्ल्यातून निसटला

लश्कर ए तैयबासाठी भरती आणि पैसा मिळवण्याच काम तल्हा सईद करतो. भारताविरुद्ध त्याने कारस्थान रचली आहेत. तल्हावर अनेकदा हल्ले झाले. पण त्यातून तो निसटला. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीत तो लाहोरमधून निवडणूक लढवत होता. पीटीआय नेता आणि माजी पंतप्रधान इम्रान खान इथून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. इम्रान खान यांना अटक झाली. त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली, त्यामुळे इम्रान खान ही निवडणूक लढवू शकले नाहीत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.