Elon Musk: “मी विसरतो तुम्ही अजूनही जिवंत आहात”, इलॉन मस्कने बड्या अमेरिकन नेत्याला लिहिलेल्या एका वाक्यामूळे होतेय जगभर टीका

ट्वीटर युद्धामुळे मस्कवर तीव्र टीका तर झालीच, पण त्याच्या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. सोमवारी टेस्लाचा स्टॉक जवळपास 2 टक्क्यांनी घसरला आणि कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 207 अब्ज डॉलर्सने कमी झाले.

Elon Musk: मी विसरतो तुम्ही अजूनही जिवंत आहात, इलॉन मस्कने बड्या अमेरिकन नेत्याला लिहिलेल्या एका वाक्यामूळे होतेय जगभर टीका
Elon Musk
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 6:00 AM

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि SpaceX चा CEO इलॉन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, यावेळी बड्या अमेरिकन नेत्याला लिहिलेल्या एका वाक्यामूळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत. जगभरातून त्याच्यावर टीका केली जातेय. त्याला अमानवी, उद्धट असल्याचं म्हटलं जातंय.

वरिष्ठ सिनेटर बर्नी सँडर्स, जे राष्ट्रपती पदाचे माजी उमेदवारही आहेत, त्यांनी ‘अतिश्रीमंतांनी त्यांच्या वाट्याला आलेला योग्य कर भरावा,’ असे ट्विट केले होते. याच्यावर मस्कने रिट्विट केलंय, “मी विसरतो की तुम्ही अजूनही जिवंत आहात.”असं मस्कने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

मस्क इथेच थांबला नाही, एका कमेंटला उत्तर देताना त्याने पुन्हा सँडर्स यांना टेस्ला स्टॉकची अधिक विक्री करण्याची ऑफर दिली. “बर्नी, मी आणखी स्टॉक विकू? फक्त म्हणा…”, असं त्याने ट्विट केलं.

शनिवारी झालेल्या या ट्वीटर युद्धामुळे मस्कवर तीव्र टीका तर झालीच, पण त्याच्या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. सोमवारी टेस्लाचा स्टॉक जवळपास 2 टक्क्यांनी घसरला आणि कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 207 अब्ज डॉलर्सने कमी झाले.

इलॉन मस्कने गेल्या आठवड्यात टेस्लाचे सुमारे 7 अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले आहेत. गेल्या महिन्यात मस्कने अब्जाधीशांच्या नफ्यावर बिडेन प्रशासनाने प्रस्तावित कराराला विरोध केला होता. त्याने ट्वीट केले की, “अखेर, त्यांच्याकडे लोकांचे पैसे संपतात आणि मग ते तुमच्याकडे येतात.” तसेच मस्कने जाहीर केले की टेस्ला आपले मुख्यालय कॅलिफोर्नियाहून टेक्सासमध्ये हलवणार आहे, जीथे राज्याचा आयकर नाही.

इतर बातम्या-

Vir Das: भारतीयांबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन वीर दासवर होतेय जगभरातील भारतीयांकडून टीका

British Diplomat coverts to Islam: सऊदी अरेबियाच्या ब्रिटीश मुत्सद्दीने इस्लाम धर्म स्वीकारला, फोटो शेअर करत केलं जाहीर

इजिप्तमध्ये विंचवांनी नांगी आपटली, आतापर्यंत 500 जणांना दंश, बाहेर न पडण्याचं सरकारचं आवाहन

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.