लंडन – इंग्लंडच्या (England) महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth)दुसऱ्या यांची प्रकृती नाजूक आहे. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निरीक्षणात (medical observation) ठेवलेले आहे. महाराणीच्या आरोग्याबाबत बकिंघम पॅलेसकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉक्टर महामहिम यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या पंतप्रधान लिज ट्रस यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
All the Queen’s four children are now with her at Balmoral Castle. Along with her grandson, the Duke of Cambridge.
This is a serious situation. #queen #queenelizabeth pic.twitter.com/6fWzhHxLol हे सुद्धा वाचा— Chris Ship (@chrisshipitv) September 8, 2022
लिज ट्रस यांनी ट्विट केले आहे, त्यात त्यांनी लिहिले आहे की- बकिंघम पॅलेसमधून आलेल्या बातमीमुळे संपूर्म देश चिंतेत आहे. माझ्या आणि देशातील सगळ्यांच्या शुभेच्छा महाराणी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत.
The whole country will be deeply concerned by the news from Buckingham Palace this lunchtime.
My thoughts – and the thoughts of people across our United Kingdom – are with Her Majesty The Queen and her family at this time.
— Liz Truss (@trussliz) September 8, 2022
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म 21 एप्रिल 1926 झाली लंडनमध्ये झाला. 20 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांनी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1945 साली त्या ब्रिटीश सैन्यात महिला विभागात दाखल झाल्या होत्या. 14 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स चार्ल्स याचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 1952 रोजी वडील किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या महाराणी झाल्या. 2 जून 1953 रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना मुकुट घालण्यात आला. 21 जून 1982 रजी त्यांचा नातू प्रिन्स विलियम याचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 2012 रोजी 60वर्षे पूर्ण केली म्हणून हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. 9 सप्टेंबर 2015 साली इंग्लंडवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या. एप्रिल 2020 मध्ये देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 9 एप्रिल 2020 रोजी त्यांचे पती पिन्स विल्यम्स यांचा मृत्यू झाला.