बाल्कनीत उभे राहून राष्ट्रगीत गात आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवत आहेत इस्रायली लोकं

Israel Soldiers : इस्रायलचे सैनिक सध्या हमास या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात गुंतले आहे. हमास विरुद्ध युद्धाची घोषणा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली आहे. इस्रायलवर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देश संकटात आहे. पण इस्रायली सैन्याने गाझा सीमेवर ताबा मिळवला आहे.

बाल्कनीत उभे राहून राष्ट्रगीत गात आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवत आहेत इस्रायली लोकं
israel hamas war
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 2:13 PM

तेल अवीव : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर पाच हजाराहून अधिक रॉकेटने भीषण हल्ला करून युद्ध सुरु केले. इस्रायलचे सैनिक शत्रूशी लढत आहेत. यावेळी संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी उभा आहे. इस्त्रायली लोक त्यांच्या घराच्या बाल्कनीत उभे राहून सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रगीत गात आहेत. इस्रायलचे राष्ट्रगीत हे ज्यूंच्या त्यांच्या जीवनातील दीर्घ संघर्षाची आठवण करून देणारे आहे आणि ते आशेचे किरण देखील दर्शवते.

जगभरातून इस्रायली देशात परतत आहेत.

देश संकटात असताना जगभरातून इस्रायली नागरिक आपल्या मायदेशी परतत आहेत. हमास विरुद्ध इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायली सैनिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी इस्त्रायली लोकं राष्ट्रगीत ‘हटिक्वा’ गात आहेत. यामध्ये ज्यू लोकांच्या दीर्घ आणि कठीण प्रवासाबद्दल आणि त्यांच्या मायदेशी परतण्याचे त्यांचे स्वप्न याबद्दल लिहिले आहे. हे गाणे इस्रायली लोकांच्या ताकदीची आणि दृढनिश्चयाची आठवण करून देते. हे ज्यू लोकांना त्यांच्या मुलांचे चांगले भविष्य घडवण्याच्या वचनबद्धतेची आठवण करून देते.

हमासकडून 5000 रॉकेटने हल्ला

शनिवारी हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेटने हल्ला केला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी जमीन, हवा आणि पाण्याने इस्रायलमध्ये घुसून नागरिकांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी अनेकांना ठार केले किंवा अपहरण केले. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. बुधवारी सकाळपर्यंत इस्रायल आणि हमास यांच्यातील या लढाईत तीन हजार लोक मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.

इस्रायली हवाई दल गाझा पट्टीवर हवाई बॉम्बफेक करत आहे. इस्रायली सैनिकही हमासच्या दहशतवाद्यांशी जमिनीवर लढा देत आहेत. गाझाला लागून असलेली आपली सीमा सुरक्षित केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलने एक लाख सैनिक मैदानात उतरवले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.