इस्रायलवर कधीही हल्ला होण्याची शक्यता, अमेरिकेनेही तैनात केल्या युद्धनौका
जगात पुन्हा एकदा अशांतता पसरण्याची शक्यता आहे. कारण इस्रायलवर इराणकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या विरुद्ध प्रत्यूत्तर म्हणून इराणकडून हल्ला केला जाऊ शकतो. यामुळे अमेरिकेने देखील पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने युद्धनौका तैनात केल्या आहेत.
Israel iran row : इस्रायल आणि इराण या दोन देशांधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. इराणकडून येत्या 24 तासांत इस्रायलवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. इस्रायल सरकारने ही याबाबत पाऊल उचलली आहेत. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जे करावे लागेल ते करु असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल देखील तयार आहे. इराणमध्ये एका इमारतीवर झालेल्या प्राणघातक बॉम्बस्फोटानंतर प्रत्युत्तर म्हणून इराण हल्ला करण्याची शक्यता आहे.
तेहरानचा बदला घेण्याचा इशारा
तेहरानने बदला घेण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. अहवालानुसार, अमेरिकेने इस्रायल आणि अमेरिकन सैन्याच्या संरक्षणासाठी अतिरिक्त लष्करी मालमत्ता पाठवली आहे. याशिवाय 2 नौदलाची विनाशक जहाजे देखील पूर्व भूमध्य समुद्रात पाठवण्यात आली आहेत. यामध्ये एक यूएसएस कार्नी आणि लाल समुद्रात हुथी ड्रोन आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांविरूद्ध हवाई संरक्षण करत होती.
काय म्हणाले अमेरिकेचे अध्यक्ष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही याबाबत इस्रायलला सूचना दिल्या आहेत की, इराण कधीही हल्ला करु शकतो. पंरतू असे न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. बायडेन यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मी शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांना विचारण्यात आले की, इस्रायलवर हल्ला करण्याबाबत त्यांचा इराणला काय संदेश आहे? यावर बिडेन म्हणाले, ‘ त्यांनी असे करू नये.’
काय आहेत इराणच्या मागण्या
गाझा पट्टीतील युद्धबंदीसह आणखी काही मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही असे इराणने म्हटले आहे. इराणला त्याच्या आण्विक कार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू करायची आहे. इराणला अमेरिकेकडून आश्वासन हवे होते की ते नियंत्रित हल्ल्यात सहभागी होणार नाहीत, जे अमेरिकेने नाकारले आहे. 1 एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील दमास्कस येथील इराणी दूतावासाच्या कॉन्सुलर ॲनेक्सवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इमारत उद्ध्वस्त झाली. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, दोन कमांडरसह त्यांचे सात सदस्य या हल्ल्यात ठार झाले. यानंतर इराणने इस्रायलवर प्रत्युत्तराची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.