तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तान केले होते काबीज, तत्कालीन राष्ट्रपतींना लटकवले होते भर चौकात

28 सप्टेंबर 1996 रोजी नजीबुल्लाहला यांची हत्या करुन काबूलच्या एरियाना स्क्वेअरमधील एका खांबाला त्यांचा मृतदेह लटकवण्यात आला होता. खांबाला लटकवण्यापूर्वी त्यांना एका ट्रकच्या पाठी बांधून काबूलच्या रस्त्यावरुन ओढत नेले होते. त्याआधी डोक्यात गोळीही मारण्यात आली होती.

तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तान केले होते काबीज, तत्कालीन राष्ट्रपतींना लटकवले होते भर चौकात
तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तान केले होते काबीज, तत्कालीन राष्ट्रपतींना लटकवले होते भर चौकात
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 1:03 AM

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रपती भवनावरही कब्जा मिळवला आहे. अशाच प्रकारे तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तानवर कब्जा मिळवत तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांची निर्घृण हत्या केली होती. (The Taliban had invaded Afghanistan 25 years ago, the then president was hanged in Bhar Chowk)

खांबाला लटकवला होता मृतदेह

28 सप्टेंबर 1996 रोजी नजीबुल्लाहला यांची हत्या करुन काबूलच्या एरियाना स्क्वेअरमधील एका खांबाला त्यांचा मृतदेह लटकवण्यात आला होता. खांबाला लटकवण्यापूर्वी त्यांना एका ट्रकच्या पाठी बांधून काबूलच्या रस्त्यावरुन ओढत नेले होते. त्याआधी डोक्यात गोळीही मारण्यात आली होती. त्यांचा भाऊ शाहपूर अहमदझाईचा मृतदेहही त्यांच्या शेजारी लटकवण्यात आला होता. काबूल जिंकल्यानंतर अफगाणिस्तानचा शासक असल्याचा दावा करणाऱ्या तालिबानकडून ही विजयाची आणि हा एक काळ संपल्याची घोषणा होती. नजीबुल्लाह हे शेवटचे राष्ट्रपती होते जे अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत हस्तक्षेपाचे देन होते. नजीबुल्लाह यांना संयुक्त राष्ट्र संघातून बाहेर काढत तालिबान्यांनी त्यांची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार तालिबानला पाकिस्तान आणि अमेरिकेने उभे केले. जेणेकरून सोवियत संघांना अफगाणिस्तानातून हाकलून लावता येईल.

सोव्हिएत युनियनने नजीबुल्लाहला राष्ट्राध्यक्ष बनवले

वयाच्या 18 व्या वर्षी नजीबुल्लाह पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान (पीडीपीए) मध्ये सामील झाले होते. हा कम्युनिस्ट विचारसरणीचा पक्ष होता. 1987 मध्ये सोव्हिएत युनियनने नजीबुल्लाला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनवले. नजीबुल्लाह सोव्हिएतच्या मदतीने राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले. परंतु दीर्घकाळ चाललेल्या युद्धानंतर त्याला समजले की साम्यवादाशी चर्चा अफगाणिस्तानात होणार नाही. त्यामुळे त्याने पीडीपीए आणि इस्लामिक परंपरेतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी अफगाणिस्तानची राज्यघटना पुन्हा लिहिली, पीडीपीएची मक्तेदारी संपवली आणि अफगाणिस्तानचे नाव बदलून रिपब्लिक ऑफ अफगानिस्तान असे केले. त्याने पीडीपीएची प्रतिमा बदलून मार्क्सवादीकडून इस्लामिक पार्टी केली आणि नजीबच्या नावापुढे ‘उल्लाह’ लावले. (The Taliban had invaded Afghanistan 25 years ago, the then president was hanged in Bhar Chowk)

इतर बातम्या

केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार, कपिल पाटलांची ठाणेकरांना ग्वाही

Trisha Kar Madhu | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, MMS डिलीट करण्याची प्रार्थना

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.