भारताच्या ‘रॉ’ची पाकिस्तानमध्ये दहशत, पाकिस्तानची यामुळे उडाली झोप
सरफराज तांबा याने २०११ मध्ये भारतीय गुप्तचर संस्थेतील एका बड्या अधिकाऱ्याची हत्या केली होती. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तांबा याच्या हत्येत 'रॉ'चा सहभाग असल्याचा आरोप केला. 'रॉ'ने दुबईमध्ये एक नेटवर्क तयार केला असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष कायम राहिला आहे. पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला जातो. तसेच भारतात दहशतवादी कारवाया पाकिस्तानकडून घडवल्या जातात. त्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेकडून अतिरेक्यांना मदत केली जाते. परंतु आता पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांची हत्या होत आहेत. त्याबाबत पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’बाबत चिंता व्यक्त केली आहे. 2021 पासून सहा बड्या दहशतवाद्याच्या हत्या पाकिस्तानमध्ये झाल्या आहेत.
दुसऱ्या देशांत घुसून हत्या
अमेरिकेतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमधील बातमीनंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली आहे. त्या बातमीत दावा केला होता की, भारताची गुप्तचर संस्था रिसर्च एंड अॅनालिसिस विंगकडून एक गुप्त अभियान चालवले जात आहे. त्यानंतर पाकिस्तानमधील एकानंतर एक दहशतवाद्यांची हत्या होत आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, दुसऱ्या देशात घुसून अतिरेक्यांना संपवण्याचा ‘रॉ’च्या योजनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन आहे.
‘रॉ’चे दुबईमध्ये नेटवर्क
एप्रिल २०२३ मध्यै सरफराज तांबा याची हत्या लाहोरमध्ये झाली होती. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांना तांबा यांची हत्या केली होती. सरफराज तांबा याने २०११ मध्ये भारतीय गुप्तचर संस्थेतील एका बड्या अधिकाऱ्याची हत्या केली होती. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तांबा याच्या हत्येत ‘रॉ’चा सहभाग असल्याचा आरोप केला. ‘रॉ’ने दुबईमध्ये एक नेटवर्क तयार केला असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. ते नेटवर्क स्थानिक गुन्हेगार किंवा अफगाणिस्तानमधील नागरिकांशी संपर्क करुन या हत्या घडवून आणत आहे.
वॉशिंग्टन पोस्टने दावा केला की, भारतीय एजंट स्थानिक नेटवर्ककडून मिळालेल्या माहितीनंतर या लोकांना हत्या करण्यासंदर्भात आदेश देते. पश्चिम देशासाठी पाकिस्तान जी रणनीती वापरत आहे, ती रणनीती आता भारत पाकिस्तानसंदर्भात वापर असल्याचा दावा या बातमीत केला आहे. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळले आहे. पाकिस्तानमध्ये राहत असलेला काश्मीर दहशतवादी सैयद सलाहुद्दीन याचा हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. 2013 मध्ये इस्लामाबादमधील बेकरीच्या बाहेर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.