Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पहिल्यांदा घडतंय : जपानमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबो सहभागी

जपानमध्ये एका विद्यापीठातल्या दिक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबोट सहभागी झाले (Things Happening First Time). कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः येण्याऐवजी प्रतिनिधी म्हणून रोबोट पाठवावेत, अशी सूचना विद्यापीठानं केली होती.

हे पहिल्यांदा घडतंय : जपानमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबो सहभागी
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 7:06 AM

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला (Things Happening First Time) आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालवधीही वाढवला आहे. भारताने देखील 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात (Things Happening First Time) अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. त्याचा हा आढावा

1. जपानमध्ये एका विद्यापीठातल्या दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबो सहभागी झाले. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः येण्याऐवजी प्रतिनिधी म्हणून रोबो पाठवावेत, अशी सूचना विद्यापीठानं केली होती. त्यामुळे रोबो आणि त्यांच्या चेहऱ्यांवर टॅबलेट लावून व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे पदवीदान सोहळा पार पडला. जपानच्या बिजनेस ब्रेक थ्रू युनिर्व्हसिटीमध्ये हा अनोखा कार्यक्रम पार पडला.

2. तुर्कीतल्या एका शहरात मोठ्या संख्येनं रस्त्यांवर मेंढ्या फिरताना दिसल्या. कोरोनामुळे रस्ते निर्मनुष्य असल्यानं अनेकांनी हे अनोखं चित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपलं. सध्या तुर्कीत १ लाख 26 हजारांहून जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

3. रशियात अपुऱ्या उपकरणांवरुन सरकारविरोधात बोलणाऱ्या 3 डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हे तिन्ही डॉक्टर खिडकीतून खाली पडले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक मृत्यूशी झुंज देत आहे. चीनप्रमाणे रशियातही आता डॉक्टरांना धमकावलं जात असल्याची तक्रार पुढे येऊ लागली आहे. ‘डेलीमेल’नं ही बातमी दिली आहे.

4. चीनविरोधात आफ्रिकी देशांमध्ये रोष वाढत चालला आहे. चीनमध्ये राहत असलेल्या अफ्रिकी लोकांना चीन दुजाभावाची वागणूक देत असल्याचं समोर आलं आहे. काही तज्ज्ञांच्या मते भारतासाठी ही चांगली संधी असून, त्याद्वारे भारत अफ्रिकी देशांसोबत अजून चांगले व्यापारी संबंध प्रस्थापित करु शकतो.

5. चीनच्याच प्रयोगशाळेतून कोरोनाचा फैलाव झाल्याचा सबळ पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी ABC वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

6. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात क्वारंटाईन करण्यात आलेल्या तब्लिगी जमातीचे 72 जण पळून गेले. त्यांच्या शोधासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय कामाला लागली आहे. पाकिस्तानात पंजाब प्रांतातच सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असून तिथला आकडा आता 7 हजारांच्या पुढे गेला आहे.

7. अशंतः लॉकडाऊनचे तोटे पाकिस्तानात दिसू लागले आहेत. सहाव्या आठवड्यातसुद्धा तिथं कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पाकिस्तानात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या वर गेला आहे. मागच्या 24 तासात 981 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

8. जर्मनीत 12 मार्चनंतर पहिल्यांदाच 24 तासात सर्वात कमी रुग्ण सापडले आहेत. रविवारच्या 24 तासात जर्मनीत 679 कोरोनाचे रुग्ण सापडले. हा आकडा कोरोनाच्या फैलावानंतरचा सर्वात कमी आकडा आहे.

9. इटलीत आता अंत्यविधीसाठी 15 लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली गेली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र फक्त काही भागात ही सवलत दिली गेली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू हे इटलीत झाले आहेत.

10. या वर्षाच्या शेवटपर्यंत अमेरिकेत कोरोनाविरोधातल्या लसीचा शोध लागलेला असेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे अमेरिकेत कोरोनाचा कहर काही केल्या थांबताना दिसत नाही. 24 तासात तिथं 1450 लोकांचा मृत्यू झाला आहे.

11. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत होणाऱ्यांचा आकडा आता इटली इतका होण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि इटलीमधल्या मृतांच्या आकड्यात अंदाजे फक्त 300 चं अंतर आहे. वास्तविक इटलीपेक्षा ब्रिटनची लोकसंख्या कमी आहे. इटलीपेक्षा ब्रिटनमध्ये कोरोना उशिरानं पोहोचला असूनही ब्रिटन सरकारनं वेळीच लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे.

12. जपानमध्ये 31 मेपर्यंत आणीबाणी वाढवली जाण्याची शक्यता आहे. रविवारी जपानमध्ये 200 नवे रुग्ण सापडले. जपानमध्येही कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत जात आहेत. सध्या जपानमध्ये 15 हजारांहून जास्त लोक कोरोनाबाधित आहेत.

13. ब्राझिलमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांच्यावर गेला आहे. मात्र तिथले राष्ट्रपती बोलसोनारो त्यांच्या समर्थनात निघणाऱ्या मोर्चाचं स्वागत करता आहे. रियो द जेनेरोमध्ये मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक जमले होते. तिथलं प्रशासन आणि ब्राझिलमध्ये विचारवंत लोक लोकांना एकत्र येण्यास मनाई करत आहेत. मात्र, खुद्द राष्ट्रपतीच समर्थकांना प्रोत्साहन देत आहेत.

14. बांग्लादेशातही एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. रविवारी तिथं 665 कोरोनाचे रुग्ण सापडले. एकटा बांग्लादेशच नव्हे तर भारतासहित जगातल्या अनेक देशात रविवारी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

15. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 1074 रुग्ण बरे झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे. एका दिवसात पहिल्यांदाच हजारहून जास्त लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

16. लॉकडाऊनचा फायदा उठवून चेन्नईत बाप आणि पोरगा दोघी घरातच दारु बनवत होते. पोलिसांना याची खबर लागल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. द्राक्षाची वाईन आणि धान्यापासून हे लोक दारु तयार करत होते. पोलिसांनी कारवाईत 30 लीटर वाईन आणि इतर धान्यापासून तयार केलेली 5 लीटर दारु जप्त केली.

संबंधित बातमी :

जगात काय घडतंय? : टाझंनियात बकरी आणि पॉपॉ फळ कोरोना पॉझिटिव्ह

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.