फ्रान्समध्ये चर्चबाहेर दहशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू
फ्रान्समधील नीस शहरामध्ये नोट्रे डेम चर्चबाहेर झालेल्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे यासह आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ( Three died in attack at Notre-Dame Church in Nice city of France )
पॅरिस : फ्रान्समधील नीस शहरामध्ये नोट्रे डेम चर्चबाहेर झालेल्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे यासह आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नीस शहराचे महापौर ख्रिस्तियन इस्त्रोसी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ( Three died in attack at Notre-Dame Church in Nice city of France )
नोट्रे डेम चर्च बाहेर हल्ला करणाऱ्या संशयित हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही जण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
फ्रांसमधील या घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकाला देण्यात आल्या आहेत. फ्रान्समधील चर्चबाहेरील घटना घडल्यानंतर सौदी अरेबियातील फ्रान्स उच्चायुक्त कार्यालयासमोरील सुरक्षारक्षकावर हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला आहे. यानंतर सौदीतील नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
फ्रान्समधील या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देखील या घटेनाचा निषेध केला आहे. दहशतावादाविरुद्धच्या लढाईत आम्ही फ्रान्ससोबत असल्याचे बोरिस जॉनसन म्हणाले आहेत.
I am appalled to hear the news from Nice this morning of a barbaric attack at the Notre-Dame Basilica. Our thoughts are with the victims and their families, and the UK stands steadfastly with France against terror and intolerance.
— Boris Johnson (@BorisJohnson) October 29, 2020
फ्रान्समध्ये यापूर्वी देखील एका शिक्षकावर हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला होता. सॅम्युअल पेटी या शिक्षकाची शाळेबाहेर हत्या करण्यात आली होती. या शिक्षकाने शार्ली हेब्दो या मासिकातील मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलचे वादग्रस्त चित्र वर्गात दाखवले होते, यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र विभागाने यापूर्वीच दहशतवादी घटनांविरोधातील लढ्यांमध्ये फ्रान्ससोबत असल्याचे जाहीर केले आहे.
संबंधित बातम्या :
भारतासोबतचा सीमाप्रश्न द्विपक्षीय, भारत-अमेरिका चर्चेनंतर चीनचा जळफळाट
( Three died in attack at Notre-Dame Church in Nice city of France )