Tibet Earthquake: भूकंपाचे धक्के, नेपाळपासून भारतापर्यंत जोरदार झटके, तिबेटमध्ये 53 जणांचा मृत्यू

Tibet Earthquake: मंगळवारी सकाळी 6.52 च्या सुमारास भूकंप झाला. नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र भारतातून अद्याप कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही.

Tibet Earthquake: भूकंपाचे धक्के, नेपाळपासून भारतापर्यंत जोरदार झटके, तिबेटमध्ये 53 जणांचा मृत्यू
Tibet Earthquake
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 11:53 AM

Tibet Earthquake: नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंप झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली. या भूकंपाचे धक्के भारत आणि बांगलादेशच्या अनेक भागात जाणवले. परंतु भूंकपाचा केंद्रबिंदू तिबेट होता. या भूकंपात किमान 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. 38 लोक जखमी झाले आहेत.

भारतापर्यंत भूकंपाचे धक्के

मंगळवारी सकाळी 6.52 च्या सुमारास भूकंप झाला. नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र भारतातून अद्याप कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही. रॉयटर्सच्या बातमीनुसार, तिब्बेटमध्ये या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिब्बेटच्या शिगात्से शहरात अनेक इमारती उद्धवस्थ झाल्या आहेत. मागील पाच वर्षांत शिगात्से शहराच्या 200 किलोमीटर परिसरात 3 किंवा त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केलचे 29 भूंकप आले आहेत. परंतु मंगळवारी आलेला भूकंप 7.1 रेश्टर स्केलचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

भारत, नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या अनेक भागांत भूकंपाचे झटके जाणवले. सिक्कमसह पूर्वत्तर राज्यांमध्ये भूकंपचे धक्के बसले. बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर लोक घरातून बाहेर आले.

हे सुद्धा वाचा

भूकंप कसे येतात?

दिल्ली एनसीआरमध्ये सध्या सातत्याने भूकंप होत आहेत. हे भूकंप कसे येतात? त्याचे उत्तर शास्त्रज्ञांनी दिले आहे. त्यानुसार, पृथ्वी सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेली आहे. या प्लेट्स त्यांच्या जागी सतत फिरत राहतात. कधीकधी त्यांच्यात संघर्ष किंवा घर्षण होते. त्यामुळे आपण भूकंप अनुभवतो. भूकंपाच्या तीव्रतेमुळे मोठा विध्वंस होण्याचा धोका असतो. जपानमध्ये नेहमी भूकंप होत असतात.

नागरिकांना असा आला अनुभव

काठमांडू येथील रहिवासी असलेल्या मीरा अधिकारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘मी झोपले होते. अचानक पलंग हादरायला लागला. मला वाटले माझे मूल अंथरुण हलवत आहे. मी फारसे लक्ष दिले नाही, पण खिडकीच्या थरथरत्या आवाजाने मला जाणवले की एक जोरदार भूकंप झाला आहे. मी पटकन माझ्या मुलाला घेऊन घराबाहेर पडलो आणि मोकळ्या मैदानात आले.

मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....