Titanic Submarine Updates : पाच अब्जाधीशांना घेऊन बेपत्ता झालेली टायटन पाणबुडी आतून दिसते कशी ?, धक्कादायक सत्य बाहेर
तब्बल अडीच लाख डॉलरचं तिकीट काढून टायटॅनिकचं अवशेष पाहण्याच्या साहसी पर्यटनासाठी चार दिवसांपूर्वी महासागरात पाच बड्या असामींसह उतरलेली पाणबुडी टायटन गायब झाली आहे. आता एक धक्कादायक सत्य बाहेर आले आहे.
दिल्ली : गेल्या रविवारपासून टायटॅनिकचे ( Titanic Wreck Location ) अवशेष पाहण्यासाठी जाताना अटलांटिक समुद्रात ( Atlantic Sea ) बेपत्ता झालेल्या टायटन या छोट्या पाणबुडीतील पाच नामी हस्तींचा 95 तास उलटून गेले तरीही काही थांगपत्ता लागलेला नाही. रेस्क्यू टीम रोबोट आणि नेव्हीच्या मदतीने शोध घेत आहे. ऑक्सिजन ( Oxygen ) संपत आला आहे. त्यामुळे आता केवळ काही चमत्कार घडला तरच चांगली बातमी मिळेल अशी अवस्था आहे. आता या पाणबुडीची आतील रचना कशी आहे याचा एक धक्कादायक सत्य समोर आल्याने तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
तब्बल अडीच लाख डॉलरचं तिकीट काढून टायटॅनिकचं अवशेष पाहण्याच्या साहसी पर्यटनासाठी चार दिवसांपूर्वी महासागरात पाच बड्या असामींसह उतरलेली पाणबुडी टायटन गायब झाली आहे. बचाव पथकाला पाणबुडी सदृश्य काही आवाज टीपता आल्याने थोडी धुगधुगी वाढली होती. परंतू त्यानंतरही काही चांगली बातमी आलेली नाही. या पाणबुडीचा साल 2022 चा ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश यांचा एक व्हिडीओ बीबीसीने शेअर केला आहे. त्यात या पाणबुडीचा आकार इतका लहान आहे की त्यात बसायला आसने ठेवलेलीच नाहीत. केवळ एक बाथरुम आणि लादीवर स्वत: अनवाणी बसलेले कंपनीचे सीईओ स्टॉकटन रॅश दिसत आहेत.
केवळ एकच खिडकी आणि
या टायटन सबमर्सिबलच्या जुन्या व्हिडीओत फ्लोअरवर मांडीघालून अनवाणी बसलेले रॅश दिसत असून त्यांच्या शेजारी खूपच कमी जागा दिसत आहे. या पाणबुडीला केवळ एक छोटे टॉयलेट आणि एकच काचेची खिडकी आहे. ज्यातून बाहेरचे समुद्राचे दृश्य दिसू शकते. वर छताला एक ओव्हरहेड लाईट आणि काही भिंतवरचे दिवे आणि खिडकीच दिसतेय. एका व्हिडीओ गेमच्या रिमोटप्रमाणे तिचे नेव्हीगेटर असून त्याद्वारे स्टॉकटन रॅश नियंत्रण करतना दिसत आहेत.
पाणबुडीचा शेवटचा कॉन्टॅक्ट
चार ते पाच दिवसांपासून ही सबमर्सिबल टायटन गायब झाली आहे, त्यात स्वत: ओशनगेटचे फाऊंडर स्टॉकटन रॅश, भारतात चित्ते आणणारे ब्रिटीश उद्योजक हमिश हार्दिंग, फ्रेंच डायव्हर पॉल हेन्री नार्जिओलेट, पाकिस्तानचे अब्जाधीश शाहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान असे पाच नामिगिरामी हस्ती अटलांटिक महासागरात नाहीशा झाल्या आहेत. मॅसॅच्युएट्स येथील केप कोडच्या पूर्वेला 900 मैलावर ( 1,450 कि.मी. ) अंतरावर या पाणबुडीचा शेवटचा कॉन्टॅक्ट झाला होता. त्यानंतर रविवार सकाळपासून अमेरिकेच्या तटरक्षक दलाला त्यांचा काही थांगपत्ता लागलेला नाही. त्यानंतर नेव्ही आणि तटरक्षक दलाची शोध मोहीम सुरुच आहे.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्याचे आकर्षण का ?
तब्बल 112 वर्षांपूर्वी बुडालेले टायटॅनिक जहाजाची कधी न बुडणारे जहाज अशी जाहीरात केली होती., परंतू त्याची कधी हिमनगाशी धडक होईल याची कल्पनाच केलेली नसल्याने ते पहिल्याच प्रवासात 1500 प्रवाशांना जलसमाधी घेऊन बुडाले. त्यावर हॉलीवूडने ऑस्कर पुरस्कारांचा पाऊस पाडणारा चित्रपट काढून त्याला एक आख्यायिका करुन टाकले. त्यामुळे टायटॅनिक जहाजाबद्दल प्रचंड आकर्षण वाढून अतिश्रीमंतामध्ये जीवावर उदार होऊन साहसी पर्यटनाच्या नावाखाली तब्बल तीन हजार मीटर समुद्रात त्याचा सांगाडा पाहण्यासाठी या धोकादायक ट्रीप सुरु झाल्या.